शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचा घोळ; महापालिकेची कागदोपत्री चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:46 IST

अकोला: महापालिका प्रशासनाने ‘जिओ टॅगिंग’ न करताच शहरात १८ हजारांपेक्षा अधिक शौचालयांची उभारणी केली. या बदल्यात प्रशासनाने कंत्राटदारांच्या देयकांपोटी २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली

अकोला: महापालिका प्रशासनाने ‘जिओ टॅगिंग’ न करताच शहरात १८ हजारांपेक्षा अधिक शौचालयांची उभारणी केली. या बदल्यात प्रशासनाने कंत्राटदारांच्या देयकांपोटी २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली. स्वच्छता विभागातील कर्मचारी व कंत्राटदारांनी केंद्र आणि राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्याची तक्रार खुद्द सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी केल्यानंतर महापालिकेने गठित केलेल्या चौकशी समितीने कागदोपत्री चौकशी केल्याचे समोर आले आहे. उपायुक्त सुमंत मोरे यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालात स्वच्छता विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षकांचे बयाण नोंदविण्यात आले असून, त्यांनी ‘जिओ टॅगिंग’ केले नसल्याचे नमूद केल्याची माहिती आहे.मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत घरी वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या नागरिकांचा सर्व्हे करून त्यांना शौचालय उभारून देण्याचे शासनाचे महापालिकेला निर्देश होते. त्यासाठी कें द्र शासनाकडून ४ हजार रुपये व राज्य शासनामार्फत आठ हजार रुपये असे प्रतिलाभार्थी १२ हजार रुपये अनुदान मनपाला प्राप्त झाले. त्यामध्ये सत्ताधारी भाजपाने मनपा स्तरावर आणखी तीन हजार रुपये अनुदान देण्याचा ठराव मंजूर केला होता. एकूणच पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. प्रशासनाने शौचालय बांधण्यासाठी खासगी कंत्राटदारांच्या नियुक्त्या केल्या. स्वच्छता विभागाने व कंत्राटदारांनी शौचालय बांधण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ करणे बंधनकारक होते. तसे न करता लाभार्थींच्या जुन्या शौचालयांना रंगरंगोटी करून त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे देयक उकळल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे व गिरीश गोखले यांनी क रीत चौकशी समितीची मागणी केली होती. उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीने कागदोपत्री चौकशी केल्याची माहिती आहे.चौकशीची औपचारिकता पूर्ण केली!शौचालयांची बांधणी करताना ‘जिओ टॅगिंग’ करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार स्वच्छता विभाग, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनी काम करणे अपेक्षित होते. लाभार्थींना विश्वासात घेऊन सर्वांनी संगनमताने शासनाच्या निधीवर डल्ला मारल्याचे चित्र असताना यासंदर्भात प्रशासनाला अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. येत्या दोन दिवसांत चौकशी अहवाल मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचे चित्र असल्यामुळे याप्रकरणी सत्ताधारी भाजपच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

प्रत्यक्ष पाहणी नाहीच!स्वच्छता विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनी लाभार्थींना विश्वासात घेऊन जुन्या शौचालयांना रंगरंगोटी करीत संगनमताने शासन निधीचा अपहार केला. उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने प्रभागांमध्ये जाऊन शौचालयांची प्रत्यक्षात पाहणीच केली नाही. या चौकशीत मनपा कर्मचारी,आरोग्य निरीक्षकांचे बयाण नोंदविण्यात आले असताना कागदोपत्री बांधलेल्या शौचालयांचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित झाला आ

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका