शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

शौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 10:46 IST

ही मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात आल्यानंतरही संबंधितांनी चौकशी अहवाल तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत गोरगरिबांसाठी कागदोपत्री बांधकाम केलेल्या शौचालयांचा घोळ तपासण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाचे प्रभारी मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी तसेच स्वच्छता व बांधकाम विभागाला ४० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात आल्यानंतरही संबंधितांनी चौकशी अहवाल तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी मनपा प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात मश्गूल असल्याचे चित्र आहे.‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी करताना महापालिकेने ‘जिओ टॅगिंग’ला पायदळी तुडवित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व निकष, नियम धाब्यावर बसविल्याचा प्रकार समोर आला.‘जिओ टॅगिंग’न करताच बांधण्यात आलेल्या १९ हजारपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालयांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी मनपाने आजवर २९ कोटींचे देयक अदा केल्याची माहिती आहे. भाजप नगरसेवकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशी समितीचे गठन केले. मनपा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या १० सदस्यीय समितीचा चौकशी अहवाल ९ डिसेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत खुद्द भाजप नगरसेवकांनी फेटाळून लावत नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.सदर अहवालात संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य निरीक्षक तसेच कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित न करता निकृष्ट ठरलेल्या शौचालयांची दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना करण्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला होता.ही बाब लक्षात घेता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ४० दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीची जबाबदारी निश्चित केली होती. ही मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात आल्यानंतरही प्रशासनाचा अहवाल तयार नसल्याची माहिती असून, लेटलतिफ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आयुक्त संजय कापडणीस कारवाई करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

सत्ताधारी-प्रशासन संशयाच्या घेºयातशौचालय प्रकरणात स्वच्छता विभाग, आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांनी चक्क लाभार्थींना विश्वासात घेऊन संगनमताने शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे धाडस केले. केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा अपहार झाल्यानंतरही सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता, सर्व काही गोलमाल असल्याचे दिसून येते.तत्कालीन उपायुक्तांचा सर्व्हे बाजूलामनपाच्या तत्कालीन उपायुक्त माधुरी मडावी यांनी टॅक्स विभागामार्फत शहरातील ८० हजारपेक्षा अधिक मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत त्यामध्ये शौचालयांची संख्या नमूद केली होती. मनपाच्या चौकशी समितीने तपासणीदरम्यान माधुरी मडावी यांनी केलेला सर्व्हे पद्धतशीरपणे बाजूला सारल्याची माहिती आहे.आयुक्तांचा लागणार कस चौकशीला ४० दिवस उलटून गेल्यावरही सर्वेक्षण करून पात्र लाभार्थींची यादी निश्चित झाली नाही. अनुदान अदा केलेल्या शौचालयांचे ‘टॅगिंग’अपूर्ण आहे. त्यामुळे लाभार्थी संख्येवर संभ्रम आहे. मुदतीच्या आत तपासणी अहवाल न देणाºया अधिकाºयांवर कारवाई करणार असल्याचे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ९ डिसेंबर रोजीच्या सभेत स्पष्ट केले होते. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई करताना आयुक्तांचा कस लागणार असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका