शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाची गैरसोय, पत्नी गेली माहेरी ! गटविकास अधिकाऱ्यांकडे पतीने मांडली कैफियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:26 IST

शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले असून, कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

- राहुल सोनोने लोकमत न्यूज नेटवर्क  वाडेगाव (जि. अकोला) : घराशेजारील नालीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाही. परिणामी, शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले असून, कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्याची तक्रार दिग्रस येथील विकास तायडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली आहे.

नालीचे सांडपाणी घरासमोर साचल्याने आरोग्य धोक्याततक्रारीनुसार, पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड क्रमांक एकमध्ये नालीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, त्या नालीतून सांडपाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक वाट तयार करण्यात आलेली नाही.परिणामी, नालीतील सांडपाणी घरासमोर साचत असून, चिमुकल्यांसह कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शौचालयाचा वापर करता येत नसल्याने संपूर्ण कुटुंबास उघड्यावर शौचास जावे लागत आहे. या समस्येमुळे पत्नी माहेरी निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

नालीच्या बांधकामासंदर्भात संबंधित मिस्त्रींना सूचना देण्यात आल्या असून, लवकरच काम सुरू करण्यात येईल.आशा सुधाकर कराळे, सरपंच, दिग्रस बु.

ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना मागील चार महिन्यांपासून तोंडी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. नालीचे बांधकाम न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल.विकास तायडे, ग्रामस्थ, दिग्रस बु.