शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चिमुकले सुटली स्टेशनवर, दिव्यांग आई-वडील ट्रेनमध्ये; जीआरपीच्या सतर्कतेनंतर झाली भेट

By सचिन राऊत | Updated: July 16, 2023 14:25 IST

आई वडील दिव्यांग असल्याची माहीती मीळाल्यानंतर अकाेला रेल्वे पाेलिसांनी तातडीने शेगाव येथे संपर्क करीत रेल्वे थांबवली.

अकाेला : अकाेला रेल्वे स्थानकावरुन अमरावती एक्सप्रेसने मुंबइकडे जात असतांना दिव्यांगाच्या डब्यामधील जागा फुल्ल झाल्यानंतर आई वडील जनरल डब्यात चढले मात्र त्यांची दाेन मुले अकाेला रेल्वे स्थानकावरच राहीली. आई वडील दिव्यांग असल्याची माहीती मीळाल्यानंतर अकाेला रेल्वे पाेलिसांनी तातडीने शेगाव येथे संपर्क करीत रेल्वे थांबवली. त्यानंतर दाेन्ही मुलांना शेगाव येथे पाठवून आई वडीलांची भेट घालूण दिली.

गजानन इंगळे हे त्यांची अपंग पत्नी व दोन मुले सुचित वय १४ वर्ष, संस्कृत, वय ६ वर्ष यांच्यासह अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकाेला रेल्वे स्थानकावर उभे हाेते. अमरावती एक्सप्रेस आल्यानंतर अपंगांच्या डब्यामध्ये प्रचंड गर्दी असल्याने गजानन इंगळे व त्यांची २ मुले कोचमधून उतरून जनरल कोचमध्ये चढण्यासाठी जात असताना इंगळे कोचमध्ये बसले. परंतु दोन लहान मुले अकाेला स्टेशनवरच राहीली़ गाडी रवाना झाल्यानंतर या संदर्भात रेल्वे पाेलिसांना महिती मिळाल्याने दोन्ही मुलांना पाेलिसांनी साेबत घेतले. त्यानंतर शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे मुलांच्या आई-वडिलांना ट्रेनमधून खाली उतरून घेण्याबाबत माहिती दिली. दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिस अंमलदार व चाइल्ड लाईन सदस्य यांच्यासह दुसऱ्या ट्रेनने शेगाव येथे पाठवून सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोला