शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सदस्य निवडीसाठी आज मनपाची सभा

By admin | Updated: February 29, 2016 02:32 IST

नवीन सदस्यांबाबत उत्स्कूता; अकोला मनपाची सभा ठरणार वादळी.

अकोला: महापालिकेत स्थायी समितीचे नवीन आठ सदस्य निवडण्यासाठी सोमवार, २९ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली. महापालिकेत २0१३ पासून स्थायी समितीच्या सदस्य निवडीवर सतत वाद झाले. मनपात सत्तापरिवर्तन होऊन भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर स्थायी समितीचे पुनर्गठन होईल ही अपेक्षा होती. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी फेब्रुवारी २0१४ मध्ये स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड केली असता, महापौरांनी मंजूर केलेल्या निवड प्रक्रियेवर काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या. यामुळे आजपर्यंत स्थायी समितीचे पुनर्गठन रखडले आहे. अशा स्थितीत नियमानुसार आठ सदस्यांचा कालावधी मार्च २0१६ मध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड प्रक्रिया प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहे.स्थायी समितीच्या सोळा सदस्यीय समितीमधून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले आठ सदस्य समितीच्या बाहेर होतील. यामध्ये भाजपचे बाळ टाले, सतीश ढगे, शिवसेनेच्या योगीता पावसाळे, अपक्ष मंगला म्हैसने, काँग्रेसचे मदन भरगड, कोकिळा डाबेराव, राष्ट्रवादीच्या शमशाद बेगम शेख फरीद, भारिपच्या धनश्री देव यांचा समावेश आहे. या आठ सदस्यांच्या बदल्यात नवीन कोणत्या आठ सदस्यांचा समावेश होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून राजकुमारी मिश्रा यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.