अल्पसंख्याक संस्थेचे आज संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:17 AM2021-02-07T04:17:10+5:302021-02-07T04:17:10+5:30

दूध संघाच्या उपाध्यक्षपदी देशमुख अकाेला: जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माेहन पंजाबराव देशमुख यांची बिनविराेध निवड ...

Today's meeting of the minority organization | अल्पसंख्याक संस्थेचे आज संमेलन

अल्पसंख्याक संस्थेचे आज संमेलन

Next

दूध संघाच्या उपाध्यक्षपदी देशमुख

अकाेला: जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माेहन पंजाबराव देशमुख यांची बिनविराेध निवड झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष जकीरउल्ला पटेल, मावळते उपाध्यक्ष सुभाष हजारी, सतीश महागावकर, राजेश पाटील, माया शिंदे, सखाराम धांडे, शांताराम राऊत आदी संचालक व व्यवस्थापक गाेविंद आगे उपस्थित हाेते.

इंगळे यांना याेगगुरू पुरस्कार

अकाेला: पुणे येथील शांतीदूत परिवाराने याेगगुरू मनाेहरराव इंगळे यांना ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल शांतीदूत परिवाराचे सर्वेसर्वा डाॅ. विठ्ठलराव जाधव यांनी घेतली. मनाेहर इंगळे यांच्याकडून निशुल्क याेगवर्ग घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम ते राबवितात.

घरकुलासाठी मनपात हेलपाटे

अकाेला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी असताना प्रशासनाकडून लाभार्थ्यांची हेटाळणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवर मनपात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

शहरात गुटख्याची सर्रास विक्री

अकाेला: शहरातील पानटपरी व गल्लीबाेळातील दुकानांमधून गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विक्री हाेत असताना अन्न व औषधी प्रशासन तसेच पाेलीस प्रशासनाकडून डाेळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे.

उस्मानीविराेधात कारवाई करा!

अकाेला: पुणे येथील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढणाऱ्या शरजिल उस्मानी याच्याविराेधात कठाेर कारवाई करण्याची मागणी भाजयुमाेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे हिंदू समाजात असंताेष असल्याचे नमूद केले असून तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले आहे.

आज निशुल्क गर्भसंस्कार कार्यशाळा

अकाेला: अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वारच्या गायत्री परिवार अकाेलाच्या वतीने येथील जानाेरकर मंगल कार्यालयात रविवारी दुपारी चार ते सहा या कालावधीत निशुल्क गर्भसंस्कार मार्गदर्शन कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील तज्ज्ञ डाॅक्टर मार्गदर्शन करणार आहेत.

‘त्या’युवकांचा केला सत्कार

अकाेला: प्रभाग १९ मधील म्हाडा काॅलनीत राहणाऱ्या यश जायले व त्याच्या तीन सहकारीमित्रांनी पाण्यावर धावणाऱ्या माेटारसायकलचा शाेध लावला आहे. त्यांच्या या प्रयाेगाची दखल घेत भाजपचे आ. गाेवर्धन शर्मा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी यश जायले व त्याच्या मित्रांचा सत्कार केला.

वाशिम बायपास चाैकात सिग्नल लावा!

अकाेला: शहरातील वाशिम बायपास चाैकात तातडीने सिग्नलव्यवस्था सुरू करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. या चाैकातून पातूर, खामगाव, मेहकर आदी गावांना जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या चाैकात जड वाहनांसह प्रवासी वाहतुकीची माेठी वर्दळ राहते. शिवाय रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुुरू असल्याने याठिकाणी वाहतूक विस्कळीत हाेत आहे.

जठारपेठ चाैकात वाहतुकीचा खाेळंबा!

अकाेला: शहरातील जठारपेठ चाैकाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून मुख्य रस्त्याच्या दाेन्ही बाजूला भाजीपालाविक्रेते, फळ व्यावसायिकांसह विविध साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या चाैकातून जड वाहतुकीसह प्रवासी वाहनांची माेठी वर्दळ दिसून येते. शनिवारी अतिक्रमणाच्या समस्येमुळे चाैकात वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला हाेता.

Web Title: Today's meeting of the minority organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.