शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:41 IST

कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी पंपांची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार्‍या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची, याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २0१७ पूर्वी शेतकर्‍यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २0१७ ते डिसेंबर २0१८ पर्यंत पाच हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यात महावितरणकडून ३0 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणार्‍या ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ३0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांना १0 सुलभ हप्ते मिळणार आहेत. जे शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाले नाहीत, त्यांनी घाई करून योजनेत विनाविलंब सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

५४ हजार शेतकर्‍यांकडे २५0 कोटींची थकबाकीजिल्हय़ातील तब्बल ५४ हजार १३२ शेतकर्‍यांकडे महावितरणची देयकापोटीची एकूण थकबाकी २५0 कोटी ३४ लाख रुपये एवढी आहे. यापैकी १३६ कोटी ९५ लाख एवढी मूळ थकबाकी असून, त्यावर १११ कोटी ५५ लाख रुपये एवढे व्याज असून, दंडापोटीची रक्कम १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी शेतकर्‍यांना फक्त मूळ थकबाकी भरावी लागणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती