शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

संघ समजून घ्यायचा तर, सर्वजण आपले हा भाव महत्वाचा; सरसंघचालकांचे अकोल्यात उद्बोधन

By नितिन गव्हाळे | Updated: August 6, 2024 20:38 IST

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

नितीन गव्हाळे, अकोला अकोला: अनेकजण संघात गेल्यास काय मिळते, असा प्रश्न करतात. संघात गेल्यास काही मिळत नाही. मिळतो फक्त आपलेपणा. संघ समजून घ्यायचा असेल तर सर्वजण आपले आहेत हा भाव महत्त्वाचा आहे. काहींमध्ये क्वचित दोषही असतीलही, तरी त्याला आपलेपणाच्या भावाने जपले पाहिजे. आपलेपण, सर्वजण आपले आहेत. हा भाव संघाच्या कार्यपद्धतीत सहज वृद्धींगत होतो. अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी अकोल्यात स्वयंसेवकांना उद्बोधन केले.अकोल्यातील उत्सव मंगल कार्यालयात मंगळवार ६ ऑगस्ट रोजी आयोजित संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे प्रांतसंघचालक दीपक तामशेट्टीवार उपस्थित होते.

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, संघाचा आत्मा स्वयंसेवकच आहे. हिंदू धर्म, संस्कृती रक्षण आणि संवर्धनासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत. संघाचे काम करीत असताना अनेक बाबी त्याला शिकायला मिळतात. सोबतच अनेक ठिकाणी त्याचा आपलेपणाच्या भावनेतून ऋणानुबंध जुळतो. हा भाव आणि जुळलेला ऋणानुबंध हीच संघशक्ती आहे. यासोबतच त्यांनी संपूर्ण विश्वाला दहशतवादासोबतच अनेक समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सर्व जिवांचे मैत्र कायम जपणे हा संघाचा सिद्धांत मूर्त रूपाने प्रकट झाला आहे व तेच आपले ध्येय आहे. परस्परांशी असलेले ऋणानुबंध आपणा सर्वांना जपायचे आहेत. स्वयंसेवक संघाचे काम करीत असताना आपलेपणा जपत असतो. संघकार्य करताना त्याला अनेक ठिकाणी आपलेपणाचा जो अनुभव येतो. आपण जेथे आहोत तेथे आपलेपणा, जिव्हाळा निर्माण व्हावा असे वातावरण असावे असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. यावेळी सत्कारमूर्ती श्याम देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार कुलदीप देशपांडे यांनी मानले. संचालन सुरेखा शास्त्री, प्रणिता आमले यांनी केले.फोटो: डॉ. मोहन भागवत नावाने 

आदर्श गोसेवा व डॉ. हेडगेवार रक्तपेढीला आर्थिक मदतकार्यक्रमात आदर्श गोसेेवा प्रकल्प आणि डॉ. हेडगेवार रक्त केंद्राला धनादेश देण्यात आला. यावेळी अनिरुद्ध देशपांडे यांनी शास्त्रीय गायन केले तर श्रीनाथ शक्तीपीठाचे आचार्य श्रीकांत गदाधर आणि त्यांच्या चमूने वेदमंत्रांचे पठण केले. कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ प्रचारकांसह संघ परिवारातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ