शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
3
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
5
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
6
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
7
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
8
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
9
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
10
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
11
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
12
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
13
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
14
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
15
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
16
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
17
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
18
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
19
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
20
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

समिती असतानाही सीईओंचे वेतन थांबवण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 14:48 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिला.

अकोला: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनेक प्रकरणे जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्या प्रकरणांची पडताळणी करून कायदेशीर अभिप्राय तसेच निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशासह पाच अधिकाऱ्यांची समिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच तयार झाली. समिती असतानाही न्यायालयीन प्रकरणात शिक्षकाचे वेतन दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिला. त्याचवेळी न्यायालयातील प्रकरणांत ४३ प्रतिज्ञापत्रे सादरच नसल्याने जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, समिती पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आस्थापनाविषयक प्रश्नांबाबत तक्रार निवारणाचा एक भाग म्हणून शिक्षकांची न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाºयांची समिती गठित करण्यात आली. शिक्षण विभागातील शिक्षकांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. ती कामे निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, पुरस्कारप्राप्त शिक्षक व इतर ज्येष्ठ कर्मचाºयाची समिती गठित करण्याचे आधीच ठरले होते. त्यानुसार पाच सदस्यांची समिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गठित केली. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस.एस. हिरुळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.बी. दहापुते, शिक्षणाधिकारी पी.जी. वानखडे, लेखाधिकारी वसंत रावणकर, पुरस्कारप्राप्त उच्चश्रेणी सहायक शिक्षक प्रभाकर रुमाले यांचा समावेश आहे. ही समिती तसेच जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख कार्यरत आहेत. तरीही एका शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणात २२ आॅक्टोबरपर्यंत वेतन न दिल्याने न्यायालयाच्या रोषाला मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाच बळी पडावे लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख प्रशासकीय प्रमुखांना अडचणीत आणत असल्याचा प्रकार घडत आहे.- न्यायालयात ४३ प्रतिज्ञापत्रे सादरच नाहीतखुद्द मुख्य कार्यकारी अधिकाºयांनाच न्यायालयाच्या रोषाला बळी पडावे लागले. तरीही विभागप्रमुख न्यायालयीन प्रकरणात हलगर्जी करत असल्याचे अनेक प्रकरणांत दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील १६१ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. त्यातील ११८ प्रकरणांत शपथपत्रे दाखल आहेत. ४३ प्रकरणात संबंधित विभागाप्रमुखांनी शपथपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे पंचायत विभागातील आहेत. ३५ पैकी २४ प्रकरणात शपथपत्रे दिलेली नाहीत. आरोग्य विभागाच्या २८ पैकी ८ प्रकरणात शपथपत्रे नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागाच्या ४४ पैकी ६, बांधकाम, लघुपाटबंधारे प्रत्येकी एक प्रकरणात शपथपत्र नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद