येथील शेतकरी राहुल सुभाष ताले यांची शेती सौरभ दिगंबर आढाऊ यांनी रब्बी पिकासाठी बटाईने केली आहे. साैरभ अढाउ हे १० जानेवारीला शेतामध्ये गेले हाेते. त्यांना वाघ व त्याच्यासाेबत बछडेही दिसले. परिसरातील शेतकऱ्यांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शेतीमध्ये गहू, हरभरा, कांदा लागवड, भुईमुगाची पेरणी आदी कामे सुरू आहेत, तसेच या पिकांना पाणी देण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांना हीही रात्र दिवस शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. विद्युत पुरवठा तीन दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा सुरू असल्याने रात्री शेतात जागलं करावे लागत आहे.
आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकरी, शेतमजुरांनी उपस्थित केला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.