खेट्री (जि. अकोला): अंगावर रॉकेल टाकून पत्नीला जीवे मारण्याची घटना २८ डिसेंबर रोजी विवरा येथे घडली. उषा रामराव ढोकणे (२२) ही विवाहित महिला घरात काम करीत होती. तिच्याशी पती रामराव ढोकण याने वाद घातला. हा वाद शांत करण्यासाठी रामराव ढोकणेंच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यन केला. मात्र, रामरावने उषाला मारहाण करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. भाजल्याने तिला सर्वेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्या जबाबवरून चान्नी पोलिसांनी रामराव ढोकणे (३0) विरुद्ध भादंविचे कलम ३0८ (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे), ४९८ (अ) (छळ), अन्वये गुन्हा दाखल केला.
रॉकेल टाकून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: December 31, 2015 02:35 IST