अकोला: थ्रेशर मशीनमध्ये सोयाबीन काढताना हात व मान गेल्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास म्हैसांगजवळील लासूर गावातील शेतशिवारामध्ये घडली. लासूर येथील शेतकरी गजानन जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळी थ्रेशर मशीनने गावातीलच मोहन भीमराव मेंडे (२३) हा सोयाबीन काढीत होता. दरम्यान त्याचा हात मशीनमध्ये गेल्याने त्याची मान मशीनमधील लोखंडी पत्त्यामध्ये ओढली गेली. यात मोहन याचा जागीच मृत्यू झाला.
थ्रेशर मशीनमध्ये हात, मान गेल्याने युवकाचा मृत्यू
By admin | Updated: October 31, 2014 01:27 IST