शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांतील रस्ते कामांच्या दर्जाची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:30 IST

त्यानुसार आता गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे असून, या तपासणीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआता शहरात गत तीन वर्षात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते कामांचे सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) सुरू करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: शासनाच्या निधीतून सन २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षाच्या कालावधीत अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला. त्यानुसार आता शहरात गत तीन वर्षात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.शासनाच्या नगरविकास विभागामार्फत गत २८ मार्च २०१८ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या दर्जासंदर्भात त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण (आॅडिट) करण्याची व्यवस्था अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या नगर विकास विभागाकडून सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ या कालावधीत वितरित निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची तपासणी त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात यावी आणि यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना दिला. त्यानुसार आता गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे असून, या तपासणीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.प्रत्येक ठेकेदारांनी केलेल्या रस्ते कामांची होणार तपासणी!गत तीन वर्षांच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या तपासणीत प्रत्येक ठेकेदारांनी केलेल्या कामांपैकी किमान एका रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासंदर्भात खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना आदेशात दिले आहेत.

‘सोशल आॅडिट’ची दखल!कामे पूर्ण झाल्यानंतर वर्षभरातच रस्त्यांवर खड्डे पडल्याने, जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते कामांचे सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) सुरू करण्यात आले. त्यामध्ये घेण्यात आलेले सहा रस्ते कामांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ‘सोशल आॅडिट’ची दखल घेत आता शासनामार्फत गत तीन वर्षात करण्यात आलेल्या रस्ते कामांची तांत्रिक तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.

शासनाच्या निधीतून गत तीन वर्षात अकोला शहरात करण्यात आलेल्या रस्ते कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याचा आदेश शासनाच्या नगर विकास खात्याच्या अवर सचिवांकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेय,जिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय