शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

महिनाभरात तीन हजारांवर जात, क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:07 IST

अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक कामांसाठी जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.अकोला व बाळापूर उप विभागांतर्गत तीन तालुक्यात ३ हजार २६२ जात व क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अकोला उप विभागांतर्गत १ हजार ७६० आणि बाळापूर उप विभागांतर्गत १ हजार ५०२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

अकोला : जिल्ह्यातील तीन तालुक्यांत गत महिनाभरात ३ हजार २६२ जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील प्रकरणांचा समावेश आहे.इयत्ता बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, शैक्षणिक कामांसाठी जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्यानुषंगाने अकोला व बाळापूर उप विभागांतर्गत अकोला, बाळापूर व पातूर या तालुक्यात जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी सेतू केंद्रांमध्ये प्रकरण दाखल झाल्यांनतर विद्यार्थ्यांना सात दिवसांत जात व क्रिमिलेअर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन संबंधित उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यामध्ये २३ जूनपर्यंत गत महिनाभराच्या कालावधीत अकोला व बाळापूर उप विभागांतर्गत तीन तालुक्यात ३ हजार २६२ जात व क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला उप विभागांतर्गत १ हजार ७६० आणि बाळापूर उप विभागांतर्गत १ हजार ५०२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती अकोला व बाळापूरचे उप विभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.जात पडताळणी झाल्यास जात प्रमाणपत्रासाठी पुरावे नको!शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या २४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार रक्त संबंंधातील (वडील, भाऊ, काका) इत्यादी नातेवाईकांची जात पडताळणी झालेल्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्याची गरज नाही. अर्जासोबत मूळ रहिवासाची कागदपत्रे जोडल्यास जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील, असेही अकोला व बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरPaturपातूर