शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हैदराबाद-जयपूरसह तीन विशेष रेल्वेंना मुदतवाढीची प्रतीक्षा; सप्टेंबरअखेर संपणार मुदत

By atul.jaiswal | Updated: September 25, 2023 13:26 IST

सणासुदीत होणार प्रवाशांची अडचण

अकोला : सुरु झाल्यानंतर अल्पावधितच लोकप्रिय ठरलेल्या हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर व ओखा-मुदुरै या तीन उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत संपत आहे. अकोला मार्गे असलेल्या या गाड्यांच्या आता केवळ एक-एक फेऱ्या शिल्लक असल्या तरी अद्यापपर्यंत दक्षीण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. या गाड्यांना मुदतवाढ न मिळाल्यास दसरा, दिवाळी व नाताळाच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने पश्चिमेकडील ओखा व्दारका, सोमनाथ यांना दक्षिण भारतातील नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, हैदराबाद या शहरांना जोडण्यासाठी काचीगुडा - बिकानेर, ओखा - मदुरै, हैदराबाद - जयपुर विशेष, राजकोट ते महबूबनगर (तेलंगणा) दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे सुरु केल्या होत्या. पहिल्या फेरीपासूनच या रेल्वेचे आरक्षण फुल्ल होते. मात्र रेल्वेने प्रचंड पाठिंबा मिळूनही रेल्वेनेकडून अद्याप या विशेष गाडीचा अवधी वाढवण्यात आला नाही. रेल्वे बंद झाल्यास हजारो व्यापारी, भाविक आणि प्रवाशांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही ट्रेन मुदतवाढ देऊन कायमस्वरूपी करण्याची मागणी व्यापारी आणि लाखो हिंदू भाविकांनी केली आहे.

ट्रेन कायमस्वरूपी केल्याने ट्रेन उशिराने धावण्याला आळा बसेल, तिकिटाचे दरही कमी होतील, त्यामुळे व्यापारी आणि भाविकांना फायदा होईल. रेल्वेने या गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी डीआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, वाशिमचे महेंद्रसिंग गुलाटी, अकोल्याचे ॲड. ठाकूर, ॲड. अमोल इंगळे, हिंगोलीचे प्रवीण पडघन, शोऐब वासेसा, शे.रियाज, शेगांवचे शेखर नागपाल, ॲड. पुरुषोत्तम डागरा यांनी केली आहे.

आता उरली केवळ शेवटची फेरीरेल्वे :                                  दिनांक०७०५४ बीकानेर - काचीगुडा : ३०.०९.२०२३०७०५३ काचीगुडा - बिकानेर : ०३.१०.२०२३०९५२० ओखा - मदुरै : २५.०९.२०२३०९५१९ मदुरै - ओखा : २९.०९.२०२३०७११५ हैदराबाद - जयपुर : २९.०९.२०२३०७११६ जयपुर - हैद्राबाद : ०१.१०.२०२३०९५७५/७६ राजकोट महबूबनगर : (ऑगस्ट नंतर मुदतवाढ नाही.)