लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:मलकापूर परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी दाम्पत्य बुधवारी रात्री शहरात येत असताना गोरक्षण रोडवर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. म्हाडा कॉलनी येथील रहिवासी विशाल विनायक दारोकार हे पत्नीसह मुलाला घेऊन एमएच ३0 एपी ६१७२ क्रमांकाच्या दुचाकीने शहरात येत होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी दारोकार दाम्पत्यास गोरक्षण रोडवर अडवले. त्यानंतर दोघांनाही मारहाण केली व त्यांच्याजवळील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १0 हजार रुपयांचा मोबाइल व एक हजार रुपये हिसकून पळ काढला. एवढेच नव्हे, तर चोरटे या दाम्पत्याची स्कूटी घेऊन पसार झाले. या प्रकरणी खदान पोलिसांनी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीवर आलेल्या तिघांनी दाम्पत्यास लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:51 IST
अकोला:मलकापूर परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी दाम्पत्य बुधवारी रात्री शहरात येत असताना गोरक्षण रोडवर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीवर आलेल्या तिघांनी दाम्पत्यास लुटले!
ठळक मुद्देबुधवारी रात्री शहरात येत असताना गोरक्षण रोडवर घडली घटना खदान पोलिसांनी दाखल केला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा