शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक— दुचाकी अपघातात तीन जण ठार

By admin | Updated: September 15, 2014 02:06 IST

बाळापूरनजीक भिकुंड नदीच्या पुलावर अपघात

अकोला : ट्रक व मोटारसायलच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरनजीक असलेल्या भिकुंड नदीच्या पुलावर रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.अकोला शहरातील आकोट फैल भागामधील पिंपळफैल येथील रहिवासी प्रेम चंद्रमनी माने (२0), अभिजित गौतम सावंत (२0), योगेश ऊर्फ गोलू धनराज मानवटर (२0) हे तीन युवक अकोल्यातील एका कॅटरिंगमध्ये कामाला होते. तिघेही कॅटरिंगच्या कामासाठी रविवारी दुपारी एमएच ३0 एएल १२६५ क्रमांकाच्या दुचाकीने पारस फाट्यावरून खामगावकडे निघाले होते. बाळापूरनजिक भिकुंड नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या एम एच ३१ बी ५६७५ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात प्रेम माने, अभिजित सावंत व योगेश मानवटकर या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून तिन्ही युवकांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तीनही युवकांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच, पिंपळफैल येथील नागरिकांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये गर्दी केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून, ट्रकही जप्त करण्यात आला आहे.