अकोला, दि. १२ : शहरात स्वाइन फ्लूचे संकट कायम असून, शुक्रवारी स्वाइन फ्लूचे संशयित आणखी तीन रूग्ण आढळून आले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात शोभा रमेश घोरमोडे (५५ रा. विठ्ठलनगर उमरी) यांना भरती करण्यात आले. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी रुग्णाचा स्नॉब घेऊन नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. गुरुवारी आणखी एका खासगी रुग्णालयात हरीश रामकुमार बांगड (७३ रा. तोष्णीवाल लेआउट) आणि जिजाबाई नामदेव सिरसाट (५३ रा. हिंगोली) यांना भरती करण्यात आले. या दोन्ही रुग्णांचेही स्नॉब व रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
स्वाइन फ्लूचे आणखी तीन संशयित रुग्ण
By admin | Updated: August 13, 2016 01:42 IST