शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ४७३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 19:23 IST

CoronaVirus News १३ मार्च रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ४०० झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १३ मार्च रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ४०० झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ५६ अशा एकूण ४७३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,०६२ वर पोहोचली आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८१३ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३९६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी १८, मोठी उमरी येथील १०, गीता नगर येथील नऊ, आलेगाव येथील आठ, कौलखेड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर व पातूर येथील प्रत्येकी सात, मुर्तिजापूर येथील सहा, जीएमसी, रिधोरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, खदान, आदर्श कॉलनी, वाशिम बायपास, रामदासपेठ, मलकापूर, रणपिसे नगर, बाळापूर व बोराळा येथील प्रत्येकी पाच, खडकी येथील चार, गांधी रोड, कळबेंश्वर, खोलेश्वर, किर्ती नगर, राम नगर, सातरगाव, अकोट, लहान उमरी, खेतान नगर, आळसी प्लॉट, माना, चोहट्टा बाजार, जूने शहर येथील प्रत्येकी तीन, तारफैल, देशमुख फैल, माधव नगर, गीरी नगर, गुडधी, हमजा प्लॉट, हिवरखेड, मेहरे कॉलनी, मुकूंद नगर, रजपूतपुरा, जाजू नगर, हरिहर पेठ, जठारपेठ, घुसर, शिवाजी नगर, बोरवाकडी व कुरुम येथील प्रत्येकी दोन, निबंध प्लॉट, राऊतवाडी, शिवणी, चोहगाव, शिवर, कान्हेरी सरप, व्दारका नगर, मेहबुब नगर, चिखलपुरा, शंकर नगर, अशोक नगर, पंचशिल नगर, तोष्णीवाल लेआऊट, गुलजारपुरा, हिंगणा फाटा, खरप, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, जामठी बु., न्यु खेतान नगर, चांदुर, सूधीर कॉलनी, रघुवीर नगर, मारोती नगर, इंद्रा नगर, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, मांजरी, पूनम हॉटेल, तुकाराम चौक, सावत्रा चाळ, लंकडगंज, गंगा नगर, नयागाव, बरलिंगा, आपातापा, भीम नगर, सोनटक्के प्लॉट, आपोती, शनी मंदीर मागे, बापू नगर, कल्याणवाडी, भागवतवाडी, महाकाली नगर, भगीरथवाडी, प्रेम नगर, लोकमान्य नगर, गाडगे नगर, पोलिस हेडक्वॉटर, चाचोंडी, गोडबोले प्लॉट, मोरगाव भाकरे, पतनवथल, लखनवाडा, स्टेशनरोड, दिपक चौक, मुर्तिजापूर रोड, तापडीया नगर, हिंगणारोड, दुधडेअरी समोर, गड्डम प्लॉट, मनकर्णा प्लॉट, राजंदा, अखातवाडा, प्रशासन विभाग, कृषि विभाग, जीएमसी हॉस्टेल, गजानन नगर, देवि पोलिस, आरटीओ रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, अनिकेत पोलिस लाईन, जय माता दी चौक, सरकारी गोडाऊन, अडगाव, हातरुण, भाकराबाद, चान्नी चौकी, गणेश गिरी, न्यु भिम नगर, दुर्गा चौक व जैन चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ व गारेक्षण रोड येथील प्रत्येकी चार, गीता नगर, लहान उमरी, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, हिंगणा, तोष्णीवाल लेआऊट, संतता नगर, सुधीर कॉलनी, गायत्री नगर, पिंजर, बोरगाव वैराळे व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, मालीपुरा, जूने शहर, जयहिंद चौक, पोलिस हेडक्वॉटर, गोकर्णकार, खोलेश्वर, वानखडे नगर, अंजनगाव, कपीलवास्तू, केशव नगर, डॉक्टर कॉलनी, चोहोगाव, बार्शिटाकळी, कापशी रोड, रणपिसे नगर,बाळापूर, डिएचओ ऑफीस, कॉग्रेस नगर, तुकाराम चौक, बालाजी नगर, पातूर, डोंगरगाव, खेडकर नगर, जूने आरटीओ रोड, किर्ती नगर, जोगलेकर प्लॉट, अनिकेत, अपोती, वृंदावन नगर, शिवाजी नगर, गुलजारपुरा, तापडीया नगर, तौलीपंच, सैद, जवाहर नगर व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

एक महिला, दोन पुरुषांचा मृत्यू

बाळापूर येथील ७० वर्षीय महिला, रजपुतपुरा, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुष व आपातापा रोड, अकोला येथील ६१ वर्षीय पुरुष अशा तिघांचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तिघांनाही अनुक्रमे, १२, ११ व १० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

३३५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून ११, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील चार, बाईज हॉस्टेल अकोला येथून २८, हॉटेल स्कायलार्क येथून ११, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून १८, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून १९, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील १८० अशा एकूण ३३५ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,०३४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,०६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १५,५२८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला