शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील तीन लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:28 IST

अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकºयांना या मदतीची प्रतिक्षा आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी १८ हजार रुपये देण्यात येत असलेली मदत तुटपुंजी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकºयांना या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना वाढीव मदत देण्याचा प्रश्न १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाºया राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार की नाही, यासंदर्भात शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली.त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत शेतकºयांना देण्यात येत आहे; परंतु पीक नुकसानाच्या तुलनेत शेतकºयांना देण्यात येत असलेली हेक्टरी मदत अत्यंत तुटपुंजी ठरत आहे. त्यानुषंगाने संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची वाढीव मदत देण्याचा प्रश्न १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाºया राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार की नाही, यासंदर्भात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.पहिल्या व दुसºया टप्प्यात वितरित अशी आहे मदत!राज्यातील ३४ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये मदतीची रक्कम १९ नोव्हेंबर रोजी आणि दुसºया टप्प्यात ४ हजार ५०० कोटी रुपयांची मदत १३ डिसेंबर रोजी शासनामार्फत जिल्हास्तरावर वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी