लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात बोरगाव मंजू येथील तिघांचा धारणी मार्गावर घटनास्थळीच मृत्यू झाला. परतवाडा शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्सजवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.बोरगाव मंजू येथील युवक चिखलदरा येथून परतत असताना त्यांचे वाहन एमएच ३० एटी १९२७ या चारचाकी वाहनाने एका झाडाला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनामधील तिघे जण घटनास्थळीच मृत झाले. मृतकांमध्ये वैभव गुलाबराव नागरे (चालक), वय २६, धीरज अशोक गिरी (२९), कृष्णा राजेंद्र दळवी (२३) यांचा समावेश आहे. तर कृणाल बाळू दहीकर (२४), प्रथमेश सुभाष कंठाळे (२0) व प्रतीक सुनील मेहरे (२६) हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना अमरावती येथील इर्वीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू येथील या गाडीमधून हे युवक प्रवास करत होते. त्या गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मृतकांपैकी धीरज अशोक गिरी हे भारतीय सैन्यातील जवान असल्याची माहिती आहे.
परतवाडा नजीकच्या अपघातात बोरगाव मंजू येथील तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:31 IST