राष्ट्रीय महामार्गावर तीन तास वाहतुक ठप्प; मुख्यमंत्र्याच्या काकू वाहतुकीत अडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:42 PM2019-11-03T18:42:39+5:302019-11-03T18:42:54+5:30

वाहतुक ठप्प झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस या सुद्घा अडकल्या होत्या.

 Three-hour traffic jam on the national highway; The Chief Minister's aunt got stuck in traffic | राष्ट्रीय महामार्गावर तीन तास वाहतुक ठप्प; मुख्यमंत्र्याच्या काकू वाहतुकीत अडकल्या

राष्ट्रीय महामार्गावर तीन तास वाहतुक ठप्प; मुख्यमंत्र्याच्या काकू वाहतुकीत अडकल्या

Next

कुरुम : मालवाहु ट्रक रस्त्याच्या मध्यभागात नादुरुस्त झाल्याने २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक तीन तास ठप्प झाली होती.वाहतुक ठप्प झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस या सुद्घा अडकल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
अकोल्यापासून अमरावती कडील राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पावसामुळे खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दोन महिण्यापूर्वी संबधित विभागाने महामार्गावरील सर्वच पुलावर जेसीबी मशीनच्या साहाय्याने रस्त्यावरील डांबर खोदकाम करून काढले आणि खड्डे भरले.याच कारणाने महामार्गावर वाहतुकीस नेहमी अडचणी निर्माण होते.दरम्यान शनिवार २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नागपुर वरुन लोहा भरून अकोलाकडे जाणारा ट्रक क्र.सी.जी. ०४ एच एस ६३८७ चे अचानक टायर फुटले. त्यामुळे, रस्त्याच्या मधोमध नादुरुस्त स्थितीत हा ट्रक अडकून पडल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. त्यामुळेख दोन्ही बाजूने चार ते पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाश्यांना तब्बल तीन तास ताटकळट बसावे लागले आहे. वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी दूसरा कोणताही मार्ग नसल्याणे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकु महाराष्ट्र राज्याच्या माजीमंत्री शोभाताई फडणवीस ह्या सुध्दा मार्ग बंद असल्याणे अडकून पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे , कुरुम चौकीचे बिट जमादार दिलीप नागोलकर,शिपाई निलेश इंगळे व सहकारी ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन खोळंबलेली वाहतूक पूर्वतत केली. (वार्ताहर)

Web Title:  Three-hour traffic jam on the national highway; The Chief Minister's aunt got stuck in traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.