शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात तिघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह; १९२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:21 IST

तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २२९ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अकोला शहर, बार्शीटाकळी व मुर्तीजापूर तालुक्यातील प्रत्येक एक अशा आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २२९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३८० झाली आहे. दरम्यान, १९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ जणांसह, जीएमसी येथील पाच, मोठी उमरी, वानखडे नगर, बाळापूर, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन, रेणूका नगर, डाबकी रोड, गोडबोले प्लॉट, लक्ष्मी नगर, दुबेवाडी, मराठा नगर, मोहोड कॉलनी, न्यु तापडीया नगर, कोठारी वाटीका, भागवत वाडी, खोपरवाडी, मलकापूर, कौलखेड, पिंपळखुटा, पारद, पारस, घुसर, मुर्तिजापूर व दहिहांडा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी मुरारका मेडीकल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, किर्ती नगर, सिंधी कॅम्प, आरटीओ रोड, किरोली, निपाणा, शरद नगर, घूसर, आदर्श कॉलनी, जीएमसी, मोठी उमरी, रेणूका नगर, मलकापूर, गिरी नगर व झेडपी कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.तिघांचा मृत्यूमंगळवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये श्रीवास्तव चौक, डाबकी रोड येथील ७५ वर्षीय पुरुष, मुर्तीजापूर तालुक्यातील पारद येथील ५० वर्षीय पुरुष व बार्शीटाकळी येथील ८५ वर्षीय पुरुष या तिघांचा समावेश आहे.

१९२ कोरोनामुक्तशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३९, कोविड केअर सेंटर अकोला येथून २२, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून दोन,अवधाते हॉस्पीटल येथून दोन, अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनिक येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून एक, होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १२० अशा एकूण १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

१,४६२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,३८० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५६८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४६२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला