शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पारस औष्णिक प्रकल्पात तीन कंत्राटी कामगार भाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:37 IST

सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.

पारस : येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात काम करीत असलेले तीन कंत्राटी कामगार भाजल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये तिन्ही मजूर भाजले असून, त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी या सर्व मजुरांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पारस प्रकल्पात गत काही दिवसांत हा दुसरा अपघात आहे. दरम्यान, सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.पारस औष्णिक वीज प्रकल्पात अंकुर एंटरप्रायजेसचे मोहन भवाने, विशाल वेरुळकर, जावेद पठाण हे ९ मे रोजी बॉयलरच्या फर्नेसमध्ये मॅन्युअल पोकिंग करीत होते. यावेळी तिन्ही कामगार भाजल्या गेले. त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिन्ही कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना १० मे रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. याबाबत औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या या विभागाचे कार्यकारी अभियंता केंडे यांनी सांगितले की, या कामगारांना हॅण्डग्लोव्हज, हेल्मेट, शूज, बेल्ट व (थर्मल वियर) पीपी किट देण्यात आली होती. सलग दुसरा अपघातऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात गत काही दिवसांपसून अपघाताची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पॅनल बोर्डवर काम करताना मंगेश मोहोड नामक कर्मचारी जखमी झाला होता. या घटनेनुसार पुन्हा तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात येत नसल्याने जीव धोक्यात टाकून त्यांना काम करावे लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाParas Thermal Power Stationपारस औष्णिक विद्युत केंद्र