शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

गोठ्याला भीषण आग; तीन गुरांचा भाजल्याने मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:24 IST

देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली;

देगाव : येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या आगीत गोठ्यात बांधलेली तीन गुरे भाजल्याने ठार झाली; तसेच गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीची घटना वेळीच निदर्शनास आल्यावर त्यावर नियंत्रण मिळवता आले.देगाव येथील माणिकराव जगदेव शेगोकार यांचा गावामध्ये गुरांचा गोठा आहे. या गोठ्याला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेले दोन बैल व एक वासरू भाजल्या गेल्याने ठार झाले; तसेच गोठ्यात ठेवलेले स्प्रिंकलर पाइप, गुरांचा चारा तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याने शेगोकार यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घरकुलच्या कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना गोठ्यात लागलेली आग दिसल्याने त्यांनी तातडीने तिथे धाव घेतली; तसेच यावेळी आवाजाने जाग आलेल्या ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या गोठ्याच्या आजुबाजूला घरे आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने या घरांपर्यंत आग पोहोचली नाही. माहिती मिळताच वाडेगाव चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन नुकसानाचा पंचनामा केला; तसेच तलाठी, पोलीस पाटील व कृषी सहायक यांनीही गोठ्याला भेट देऊन पाहणी केली. शेगोकार यांचे या आगीत मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfireआग