शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील तीन खेळाडू करतील प्रथमच विमान प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:12 IST

आता महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली आहे.

- नीलिमा शिंगणे-जगड लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्पर्धेसाठी खेळाडूंना करावयाचा प्रवास अत्यंत त्रासदायक. भारतीय रेल्वे आणि सरकारी बस हेच खेळाडूंना स्पर्धा ठिकाणी जाण्याचे साधन. राष्ट्रीय स्पर्धा असल्या तर या राज्यातून त्या राज्यात जाण्याकरिता दोन-तीन दिवसांचा प्रवास. प्रवासातच खेळाडू थकून जातात, याचा परिणाम खेळाडूंच्या खेळ कामगिरीवर होतो; परंतु आता महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली आहे. यामुळे निश्चितच खेळाडूंची कामगिरी उंचावणार आहे. अकोल्यातील खेळाडूंनादेखील यामुळे प्रथमच विमान प्रवास करण्याचे भाग्य लाभले आहे. बॉक्सर अजय पेंदोर, पूनम कैथवास आणि कबड्डीपटू सूरज पवार असे या भाग्यवंत खेळाडूंचे नाव आहे.तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ९ ते २२ जानेवारी या कालावधीत गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत १७ ते २१ या वयोगटाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्राला अधिकाधिक पदके मिळून पदकतालिकेमधील प्रथम स्थान अबाधित राहावे, याकरिता शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे निवड चाचणी घेण्यात आली. राज्य संघात निवड झालेल्या खेळाडूंचे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. यानुसार राज्य संघ निवड चाचणी व स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराकरितादेखील राज्य शासनाने खर्चाला मंजुरी दिली आहे. तसेच गुवाहाटी येथे सहभागी होणाºया खेळाडू, मार्गदर्शक तसेच संघ व्यवस्थापक यांना जाण्याचा पुणे ते गुवाहाटी विमान प्रवास, गुवाहाटी ते कोलकाता विमान प्रवास व कोलकाता ते पुणे रेल्वे प्रवास असा प्रवास करण्यास प्रतिव्यक्ती आठ हजार याप्रमाणे निधी उपलब्ध करू न देण्यात आला आहे. प्रशिक्षण शिबिर, हवाई प्रवास आदी बाबीकरिता शासनाने रुपये ८३,५५,२०० (रुपये त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार दोनशे) खर्चास मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. अजय पेंदोर, पूनम कैथवास आणि सूरज पवार प्रथमच विमान प्रवास करीत आहेत. ‘स्वप्नातसुद्धा खरी न वाटणारी गोष्ट सत्यात घडणार’, असल्याने खूपच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया या तिघांनी दिल्या. विमान प्रवास तर नावीन्याची गोष्ट आहेच; पण त्याआधी आम्ही खेळ कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे, असेदेखील या तिघांनी निक्षून सांगितले. महाराष्ट्राचा कबड्डी संघ ७ जानेवारी रोजी तर बॉक्सिंग संघ १४ जानेवारी रोजी स्पर्धेकरिता रवाना होणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला