शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:37 IST

आंतरवासिता डॉक्टरला एका समाजसेवकाने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी घडला.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात कार्यरत महिला आंतरवासिता डॉक्टरला एका समाजसेवकाने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी महिला आंतरवासिता डॉक्टरने अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार दिली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचा बहुतांश कारभार हा निवासी आणि आंतरवासिता डॉक्टरांच्या भरवशावर चालतो. रुग्णांची वाढती संख्या ही उपलब्ध डॉक्टरांच्या नियंत्रणापलीकडे आहे. अशातच काही लोकांकडून डॉक्टरांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रकार नेहमीच दिसून येतो. असाच काहीसा प्रकार गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात घडला. अपघात कक्षात महिला आंतरवासिता डॉक्टर रुग्ण सेवा देत असताना एक समाजसेवक रुग्णाला घेऊन डॉक्टरांना भेटला अन् वादाला सुरुवात केली. शाब्दिक वाद सुरू असताना त्या समाजसेवकाने महिला डॉक्टरला मारण्याची धमकी दिली. डॉक्टर अन् समाजसेवकामधील हा वाद पेटल्याने संतप्त डॉक्टरांनी घटनेचा निषेध करीत अधिष्ठाता यांचे कार्यालय गाठले. यावेळी आंतरवासिता डॉक्टरांनी संबंधित समाजसेवकाविरुद्ध तक्रार दिली. अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करण्यात येत असल्याचे सांगितले.अपघात कक्षात कार्यरत एका आंतरवासिता डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करीत आहोत. तसेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला