अकोला: आर्थिक वादातून रतनलाल प्लॉटमध्ये राहणारे व्यापारी अनुप निरंजन डोडिया (३५) यांना दोघा जणांनी मंगळवारी सायंकाळी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी काळा मारोती मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुप डोडिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी ते काळा मारोती मंदिरात दर्शनासाठी गेले असता, या ठिकाणी गौरव अशोक शर्मा, अशोक केदारमल शर्मा यांनी येऊन अनुप डोडिया यांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अनुप व गौरव यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. या व्यवहारातून त्यांच्या वाद निर्माण झाले होते. अनुप यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: April 12, 2017 02:09 IST