शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मूळ कागदपत्रे देण्यासाठी हजारो रुपयांची मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:33 IST

अकोला : अवैध संपत्ती आणि मालमत्ता गोळा करण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडीची कारवाई केलेल्या अकोल्याच्या गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेच्या संचालिका मीना माहुरे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

ठळक मुद्देमीना माहुरे यांचा आणखी एक प्रताप उघडकीसत्रस्त प्रशिक्षणार्थीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवैध संपत्ती आणि मालमत्ता गोळा करण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडीची कारवाई केलेल्या अकोल्याच्या गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेच्या संचालिका मीना माहुरे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीचे मूळ कागदपत्रे तिला परत देण्यासाठी मीना माहुरे यांनी सदर विद्यार्थिनीकडे ५५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबतच जुने शहर पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही दिली आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील गोरव्हा या गावात राहणारी अश्‍विनी सुनील डोंगरे ही विद्यार्थिनी सन २0१३-१४ ते सन २0१५-१६ या कालावधीमध्ये गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेत आरजीएनएमचे प्रशिक्षण घेत होती. जानेवारी २0१७ मध्ये तिने हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्णही केला. या संस्थेद्वारे विविध कारणाने आकारली जाणारी सर्व ‘फी’देखील तिने अदा केली आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर सदर विद्यार्थिनीने संचालिका मीना माहुरे यांच्याकडे संस्थेत प्रवेश घेतेवेळी सादर करण्यात आलेली सर्व शैक्षणिक मूळ कागदपत्रे परत देण्याची विनंती केली असता, मीना माहुरे यांनी तिच्याकडे ही कागदपत्रे परत देण्यासाठी ५५, 000 रुपयांची मागणी केली. सदर विद्यार्थिनी ही गरीब कुटुंबातील असून, तिचे वडील शेतात मजुरी काम करतात. एवढी मोठी रक्कम कशासाठी मागितली जात आहे, अशी विचारणा केली असता मीना माहुरे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिले, तसेच मी पोलिसांना खरेदी केले आहे, कोणी माझे काहीच वाकडे करू शकत नाही, अशी उर्मट भाषा वापरल्याचा आरोप सदर विद्यार्थिनीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

आमरण उपोषणाचा इशारानर्सिंगचा कोर्स पूर्ण करूनही गेल्या आठ महिन्यांपासून मूळ कागदपत्रांअभावी नोकरीपासून वंचित असल्याने मी हताश आणि निराश झाले असून, मला न्याय न मिळाल्यास मी आमरण उपोषण करून माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन, त्यासाठी सर्वस्वी मीना माहुरेच जबाबदार राहतील, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.