शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी धावले हजारो अकोलेकर, पहिली 'फिट अकोला' मॅरेथॉन उत्साहात

By atul.jaiswal | Updated: March 10, 2024 11:58 IST

तरुणांसोबत वरिष्ठांचाही सहभाग, महिलांची संख्या लक्षणीय

अकोला  : अकोलेकरांचा प्रचंड उत्साह, प्रतिसाद, तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पहिली 'फिट अकोला मॅरेथॉन' रविवार, १० मार्च रोजी उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासनाकडून लोकसहभागातून आयोजित या मॅरेथॉन'मध्ये सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला. महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती.

वसंत देसाई स्टेडियम येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, रेस डायरेक्टर डॉ. राजेंद्रकुमार सोनोने यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट, जसनागरा पब्लिक स्कुलचे सिमरनजीतसिंह नागरा, संचालक अमृता नागरा, जिल्हा अग्रणी बँकेचे नयन सिन्हा, स्टेट बँकेच्या मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

देसाई स्टेडियम येथून दुर्गा चौक, नेहरू पार्क चौक, संत तुकाराम चौक, अशोक वाटिका मार्गे पुन्हा वसंत देसाई क्रीडांगण असा स्पर्धेचा मार्ग होता.शहरात प्रथमत:च आयोजित होणाऱ्या या २१ किमी लांबीच्या हाफ मॅराथॉनला अकोलेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किमी व 5 किमी या तीन प्रकारांत झाली.

पहाटे चार पासूनच स्पर्धक गोळा व्हायला सुरुवात झाली होती. साडेपाचला प्रारंभ झाला. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. वरिष्ठ व ज्येष्ठही स्पर्धेत अग्रेसर होते. विद्यार्थिनी व महिलांची संख्याही लक्षणीय होती. दिव्यांग तरुणही सहभागी झाले होते. नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या एका विद्यार्थिनीने सहभाग घेतला. बहुतेक सहभागींनी आपली नियोजित धाव पूर्ण केली.

सहभागींचा हा उत्साह वाखाण्यासारखा आहे. असा उत्साह पाहूनच आम्हाला ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया केतकी माटेगावकर हिने व्यक्त केली.पर्यटन व नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम घेण्यात आला. भविष्यात ४२ किमी लांबीची पूर्ण मॅराथॉनही आयोजित करण्याचाही मानस आहे, असे जिल्हाधिकारी  अजित कुंभार यांनी सांगितले. चालणे, धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. अकोल्यात यापूर्वी वाकेथॉन आयोजित करण्यात आल्या. हाफ मॅराथॉन प्रथमत:च होत आहे. ही शहरासाठी मोठी उपलब्धी आहे, असे  सोनोने यांनी सांगितले.

सहभागींना इलेक्ट्रॉनिक चिपसह बिब, तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र, टी शर्ट, मेडल देण्यात आले. मार्गावरील चौकांमध्ये ओआरएस, बूस्टरची व्यवस्था करण्यात आली होती. ‘मिलेट इयर’च्या पार्श्वभूमीवर मिलेटपासून तयार केलेल्या अल्पोपहाराची व्यवस्था होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, जसनागरा पब्लिक स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. पेसर शाश्वत कदम, राजेश निस्ताने, नेपाळहून आलेले शेर थारू, अमरेशकुमार, नाईक, केनियाहून आलेले श्री. इसाई यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना गौरविण्यात आले