शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची  नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:33 IST

अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या  सिनेट निवडणुकीत उतरणार्‍या काही संघटनांनी  खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची  नोंदणी केल्याचा आरोप युवाविश्‍व संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी विद्यापीठातील  कुलसचिवांकडे केली आहे. 

ठळक मुद्दे विद्यापीठ सिनेट निवडणूक कारवाईची ‘युवाविश्‍व’ ची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या  सिनेट निवडणुकीत उतरणार्‍या काही संघटनांनी  खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची  नोंदणी केल्याचा आरोप युवाविश्‍व संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी विद्यापीठातील  कुलसचिवांकडे केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २0१६ नुसार  विद्यापीठ सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास  मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू  केली. या निवडणुकीमध्ये मतदार यादीत मे २0१६ व  जुलै २0१७ या कालावधीत अमरावती विभागातील  हजारो पदवीधरांनी, नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात  सभासद म्हणून नोंदणी केली. या नोंदणीचा व्हॅलूम  प्रकाशित झाल्यानंतर मतदार नोंदणी बंधनकारक आहे.  पण, व्हॅलूम प्रकाशित झाल्यानंतर शेकडो पदवीधर  सभासद त्यांच्या नावाची मतदार म्हणून ऑनलाइन  नोंदणी करण्यासाठी गेले असताना, त्यांची नोंदणी होत  नव्हती, आधीच नोंदणी झाल्याची सूचना लिहून येत  होती. त्यामुळे पदवीधरांचा संभ्रम वाढला. त्यांच्या  नावाची नोंदणी केली नसताना, नोंदणी झाल्याचे कसे  काय दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे आता विद्या पीठाकडे मूळ प्रत सादर कशी करावी, असा त्यांना प्रश्न  पडला. त्यामुळे पदवीधरांच्या या समस्येवर लक्ष  वेधण्यासाठी आणि त्यांना मतदानाचा अधिकार व  न्याय मिळवून देण्यासाठी ‘युवाविश्‍व’ संघटनेचे संस्था पक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी १३ जुलै २0१७  रोजी सहायक कुलसचिव तथा उप निवडणूक निर्णय  अधिकारी पी.यू. तालान यांची भेट घेतली आणि  पदवीधरांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारावे किंवा नोंदणी  झालेल्या पदवीधरांच्या नावांचा मतदार यादीमध्ये  समावेश करावा, अशी मागणी अँड. गावंडे यांनी केली;  परंतु त्यांनी मतदार यादीमध्ये कोणताही बदल करता  येणार नसल्याचे स्पष्ट केले. 

खोट्या स्वाक्षरी करून नोंदणी केली कुणी? पदवीधरांना नोंदणीची माहिती नव्हती, तर त्यांच्या  खोट्या स्वाक्षरी करून नोंदणी केली कोणी आणि हे  अर्ज वैध कसे ठरले. यासंबंधी ‘युवाविश्‍व’ संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी ५ स प्टेंबरला तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाईची  मागणी केली आहे. तसेच यासंबंधीची तक्रार कुलगुरू  डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे सुद्धा केली आहे.

विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी पदवीधरांची नोंदणी  प्रचलित पद्धतीने आणि नियमानुसार झाली आहे.  त्यामुळे पुन्हा ऑनलाइन अर्ज स्वीकारणे किंवा मतदार  यादी पदवीधरांच्या नावांचा समावेश करता येणार नाही.  युवाविश्‍वच्या आरोपांमध्ये तथ्य नाही; परंतु त्यांच्या  काही सूचना स्वागर्ताह आहेत. - डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, एसंत गाडगेबाबा  विद्यापीठ अमरावती