शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

फरदळीचा मोह टाळा, गुलाबी बोंडअळीला बसणार आळा; कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात

By रवी दामोदर | Updated: January 15, 2024 18:28 IST

जिल्ह्यात कृषी विभाग करणार जनजागृती

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे कपाशी उत्पादनात प्रचंड घट होते. यंदाही कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात असून, पुढील हंगामाकरीता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाभरात कृषी विभाग जनजागृती करणार आहे.

खरीप हंगामात मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या विलंबाने झाल्या. सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात असून, जादा उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर सुरु राहते. त्याचबरोबर, जिनिंग व प्रेसिंग मिल, गोदामे, मार्केटयार्ड याठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जात असल्याने अशा कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था नंतर घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उपाययोजना म्हणून फरदड निर्मुलन करणे हा कपाशी पिकामध्ये महत्वाचा भाग असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले.

बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे उपाय करा!फरदडपासून मिळणारे उत्पन हे साधारणत: डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतले जाते. हा कालावधी गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक असून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कापसाची तिसरी वेचणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यानंतर शेतातून कापूस पिक काढून घ्यावे. कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर चरण्यासाठी बकऱ्या,गाई इतर ढोरे सोडावेत. जनावरानी प्रादुर्भाव युक्त बोंडे खाल्ल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

पऱ्हाट्याचा शेतात ढीग रचून ठेवू नये. त्यामुळे बोंडअळी ढिगाखाली कोषावस्थेत जाऊन लपू शकते. काढलेल्या पऱ्हाटयाचे कंपोस्ट खत बनविण्यावर भर देण्यात यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करावे. - शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी