शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

तेल्हा-यात ‘बर्निंंग कार’चा थरार!

By admin | Updated: March 15, 2016 02:35 IST

ऑटोरिक्षा,बसला धडक, नंतर उडाला भडका: चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

तेल्हारा (जि. अकोला): शहरातील मुख्य मार्गाने जाणार्‍या भरधाव इंडिका कारने आधी ऑटोरिक्षाला उडविले व नंतर बसला धडक दिली. त्यानंतर या कारचा भडका उडाला. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावा असा थरारक प्रसंग सोमवार, १४ मार्च रोजी तेल्हारा येथील नागरिकांनी अनुभवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. कार बेदरकार चालविणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.अकोला येथून सागर पांडुरंग सरप (२४), शशी गजानन भागवत (२६), दीपक सुखदेव राऊत (२४) व सिद्धार्थ अशोक बोरकर असे चौघे युवक सोमवारी एम.एच. २३ ई. ८३७६ क्रमांकाच्या इंडिका कारने तेल्हारा शहरात आले. काम आटोपल्यानंतर कारने अकोल्याकडे परत निघाले. यावेळी इंडिकाचालक कमाल वेगात कार चालवत होता. साई गणेश संकुलाजवळ अनियंत्रित कारने एम.एच. २७ एच. ४४४७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाला धडक दिली. यामध्ये ऑटोरिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर इंडिका कार तशीच भरधाव अकोल्याच्या दिशेने निघाली. शहराबाहेर येताच सदर कारने गोपाळराव खेडकर महाविद्यालयासमोर उभ्या असलेल्या तेल्हारा आगाराच्या एम.एच. ४0 एन. ८२८५ क्रमांकाच्या बसला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, त्यामुळे इंडिका कारचे चारही दरवाजे ह्यलॉकह्ण झाले. तेथे उपस्थित नागरिकांनी चौघांना कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर क्षणार्धात इंडिका कारने पेट घेतला. थोड्या वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार नंदकिशोर नागलकर, सहायक पोलीस निरीक्षक रामभाऊ भास्कर, भस्मे यांनीही घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले; परंतु अग्निशमन वाहन घटनास्थळी उशिरा पोहोचले. तोपर्यंंत इंडिका कार जळून खाक झाली होती. बसचालक अनिल श्रीराम गावंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इंडिकाचालक शशी भागवत याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३३७,२७९ अन्वये गुन्हा दाखल केला.