शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी तिसरा ओव्हरब्रिज!

By admin | Updated: July 7, 2017 01:41 IST

लीफ्ट आणि वायफाय झोनचे कामही युद्धस्तरावर : खासदार धोत्रे यांनी जाणून घेतल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी लवकरच तिसरा ओव्हरब्रीज आणि सरकता जीना गड्डम प्लॉटकडून उभारला जाणार असून, येथे प्लॅट फार्म , रेल्वे तिकीट केंद्राची निर्मिती होणार आहे. अकोला रेल्वेस्थानक विकासाच्या या प्रकल्पांवर ३० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, अशी माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिली. रेल्वे समस्यांबाबत आयोजित प्रवाशांच्या दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.रेल्वेस्थानकावर येणाऱ्या समस्यांबाबत खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधवा असे निर्देश प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून आल्यामुळे गुरुवारी अकोला रेल्वे स्थानकावर भाजपच्यावतीने दरबार ठेवण्यात आला होता. अकोला रेल्वेस्थानक प्रबंधक जी.बी.मीणा यांच्या कक्षात बसून आधी खा.धोत्रे यांनी प्रवाशांच्या समस्या ऐकून घेतल्यात. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत रेल्वे प्लॅट फार्मवरील साफसफाईचा आढावा घेतला. त्यानंतर आरपीएफसमोरून दुसऱ्या दादऱ्यालगत होणाऱ्या लीफ्टआणि गड्म प्लॉटकडून उभारल्या जाणाऱ्या ओव्हरब्रीजच्या जागेची पाहणीही त्यांनी केली. रेल्वेस्थानक परिसरात वायफाय झोन आणि लीफ्टचे काम पंधरवड्यात होणार असून मालधक्क्यावरील समस्या सोडविण्यासाठीही आपण पुढाकार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तत्काळच्या आरक्षण तिकिटात होणारा एजंटचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे; पण काहींची दुकानदारी अजूनही सुरूच आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून काही बाबी सक्तीच्या कराव्या लागतील तसेच तिकीट केंद्रावर होणारा गैरवापर टाळण्यासाठी सीसी कॅमेरे येथे लावावेत असे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिल्याचे ते म्हणाले. अकोला रेल्वे स्थानकाकडे सामान स्कॅनिंग मशीन पडून आहे. तीदेखील कार्यरत करण्याकडे खासदारांचे लक्ष वेधले गेले. असा इशाराही खा.धोत्रे यांनी दिला. यावेळी खासदार धोत्रे यांच्यासमवेत आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय पनपालिया, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, वसंत बाछुका, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, उपमहापौर वैशाली शेळके, राहुल देशमुख, सुमन गावंडे, सारिका जैस्वाल, डॉ. विनोद बोर्डे, संजय जिरापुरे,धनंजय गिरीधर, हरीश अलीमचंदानी, अनूप गोसावी, गिरीश जोशी, विनोद मानवानी, गीतांजली शेगोकार, जयंत मसने, अनिल गरड, सतीश ढगे, संतोष पांडे, धनंजय धबाले, हिरा कृपलानी, राजेंद्र गिरी,अ‍ॅड.राजेश प्रधान, नाना कुलकर्णी, दीपक मायी, हरिभाऊ काळे, अनिल गरड, प्रवीण जगताप, विशाल इंगळे, अनिल मुरुमकर, अभियंता रायबोले, मल, ठाणेदार बढे, निकम, भुसावळचे अधिकारी अरुण कुमार, दक्षिण मध्य रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.बोर्डाचे अधिकार स्वातंत्र्यपूर्व काळातीलरेल्वे विभाग स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याने रेल्वे बोर्डाला विशेष अधिकार देण्यात आले आहे. बोर्डाचे हे वर्चस्व अजूनही अबाधित आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून आता त्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे इतर मंत्रालयाप्रमाणे या विभागात कामे होत नाहीत, असेही एका प्रश्नाच्या उत्तरादाखल खा.धोत्रे यांनी सांगितले.