शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्हा राज्यात तिसरा

By admin | Updated: February 16, 2016 00:57 IST

खामगाव येथील शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निर्माण झाला होता पेच.

खामगाव : राष्ट्रीय लोकसंख्या रजिष्टर अद्ययावतीकरणात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. उल्लेखनीय म्हणजे, शिक्षकांनी या कामी बहिष्कार टाकल्यानंतर नगरपालिका, पंचायत समिती कर्मचारी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून तोडगा काढत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणासाठी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील शिक्षकांची प्रगणक म्हणून ऑक्टोबर महिन्यात नियुक्ती केली होती; मात्र शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांना जनगणना, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक अशी कामे वगळता अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे दिल्या जावू नये. त्याचप्रमाणे शिक्षक सरल डाटाबेस माहिती ऑनलाइन भरणे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र पायाभूत चाचणी, प्रथम सत्र आकारीत व संकलीत मूल्यमापन व त्यांच्या नोंदींची कामे असल्याचे कारण पुढे करीत, खामगाव नगरपालिकेच्या ४८ शिक्षकांसह जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी एनपीआर सर्वेक्षणाच्या कामास स्पष्टपणे नकार दर्शविला होता. इतकेच नव्हे तर प्राथमिक शिक्षक संघाच्या खामगाव शाखेसह राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी एनपीआर नोंदणी अद्ययावतीकरणाच्या प्रशिक्षणावर बहिष्कारही टाकला होता. राज्यातील सुमारे १५ हजार शिक्षकांनी या कामी नकार दर्शविल्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर सर्वेक्षणाचा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, या राष्ट्रीय कार्यासाठी नगरपालिका आणि महापालिका स्तरावर विविध विभागातील कर्मचार्‍यांसह, आयटीआयमधील शिकाऊ उमेदवार आणि काही सुशिक्षित बेरोजगारांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षकांच्या बहिष्कारावर तोडगा! राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) च्या अद्ययावतीकरणासाठी स्थानिक प्रशासनाच्या विविध विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सुशिक्षित बेरोजगारांची मदत घेण्यात आली. सुरुवातीला ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावयाचे हे सर्वेक्षण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यानंतर जानेवारी अखेरीस या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यानंतरदेखील स्थानिक प्रशासनाने यशस्वी तोडगा काढत, सर्वेक्षण पूर्ण केले. जिल्हाधिका-यांकडून अभिनंदन! केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी रजिस्टर अद्ययावत करण्याच्या कामात स्थानिक प्रशासनाने कार्यतत्परता दाखविली. विहित मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याने जनगणना कार्यालयाच्या यादीमध्ये बुलडाणा जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना पत्र देत, अभिनंदन केले आहे, तसेच भविष्यातही अशाच तत्परतेची अपेक्षा व्यक्त केली आहे.