शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जिल्ह्यात चोरट्यांची दहशत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:45 IST

 शहरासह जिल्हय़ात  चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दर दिवसाला तीन ते चार घरफोड्या, लुटमारीच्या घटना होत असताना पोलिसिंग मात्र कुठेही दिसत नसल्याचे यावरू न दिसते आहे. गत महिन्यापासून चोर्‍यांची मालिका सुरूच असताना पोलिसांनी केवळ बोटावर मोजण्याइतक्या चोर्‍यांचा तपास केला आहे. गत आठ दिवसांमध्ये चोर्‍या, खून, दरोडा, लुटमारीच्या जास्त घटना घडल्या आहेत.एकूणच जिल्हयात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार घरफोड्या उघडपोलिसिंगचा बट्टय़ाबोळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  शहरासह जिल्हय़ात  चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दर दिवसाला तीन ते चार घरफोड्या, लुटमारीच्या घटना होत असताना पोलिसिंग मात्र कुठेही दिसत नसल्याचे यावरू न दिसते आहे. गत महिन्यापासून चोर्‍यांची मालिका सुरूच असताना पोलिसांनी केवळ बोटावर मोजण्याइतक्या चोर्‍यांचा तपास केला आहे. गत आठ दिवसांमध्ये चोर्‍या, खून, दरोडा, लुटमारीच्या जास्त घटना घडल्या आहेत.एकूणच जिल्हयात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.या तीन घरातून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. स्वप्नशिल्प या अपार्टमेंटमधील रहिवासी सुरज इंगळे, गणेश लोखंडे व एकबोटे या तिघांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरात १७ दिवसांत १५ चोर्‍याशहरात १७ दिवसांत १५ चोर्‍या झालेल्या आहेत. यामध्ये विलास ठोसर यांची एम एच ३0 ए एफ ४१४ क्रमांकाची कार पळविली. मृणाली मनोज खंडेलवाल यांच्या गळय़ातील २५ ग्रॅमची सोनसाखळी व ३0 हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला. दीपक मराठे यांच्या घरातून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अजीमशहा करीमशहा याने कपिलवस्तू नगरातून एका विद्यार्थिनीची सोनसाखळी पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्यास पकडले. अब्दुल शकील अब्दुल सलाम ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यासोबतच त्यांचे बंधू अब्दुल खलील अब्दुल सलाम, अख्तर अली बशीर अली, अब्दुल शाहीर अब्दुल माजीद यांच्याही घरात चोर्‍या करण्यात आल्या. संजय चौधरी व प्रमिला थोटे यांच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यानंतर रविवारी पहाटे गीतानगरातील पंकज पनपालीया, गौरक्षण रोडवर तीन घरफोड्या, अशा एकूण १५ घरफोड्या झाल्याचे उघड झाले.

शहरासह जिल्हय़ात घटना घडत आहेत. मात्र, त्याचा तपासही सुरू असून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात येत आहेत. खदान, सिव्हिल लाइन्स व जुने शहरात झालेल्या चोर्‍यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तरीही या घटना रोखण्यासाठी आता पोलिसिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू, काही अधिकारी-कर्मचार्‍यांना सूचना देऊन तपासाला गती देण्याचा प्रयत्न करू. तसेच चोर्‍यांचा छडा लावण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येईल.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला.