शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चिमणी वाचवण्यासाठी ते करतात भगीरथ प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 17:31 IST

World Sparrow day special : पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्यासाठी धडपड करुन त्यांच्यासाठी घरातच अनेक घरटी लावली आहे.

- संजय उमक मूर्तिजापूर : आजमितीला चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे, चिमणी वाचविण्यासाठी अनेक संस्था व सामाजिक संघटना पुढे येत आहेत, परंतु मूर्तिजापूर शहराला लागून असलेल्या सिरसो (पुंडलिक नगर ) येथील पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्यासाठी धडपड करुन त्यांच्यासाठी घरातच अनेक घरटी लावली आहे. सद्यस्थितीत त्यांच्या घरात चिमण्यांसह विविध पक्षी पहायला मिळतात.          ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले पंकज गुजर यांनी चिमणी वाचविण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी ते अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. चिमण्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारातील छताला विविध घरटी उभारली आहेत, या घरट्यां शिवाय त्यांच्या चाऱ्या पाण्याचीही बारमाही व्यवस्था ते करतात, आता त्यांच्या घरात चिमण्यां आणि विविध पक्षी वास्तव्य करीत आहेत, अनेक अनोळखी पक्षी वा व्यास्तव्यास असल्याचे गुजर सांगतात. काळाच्या ओघात व सिमेंटच्या जंगलात चिऊताई चिवचिवाट कमी झाला आहे, चिऊताईचा संदर्भ लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत असला तरी चिमणी वाचविण्यासाठी त्या ताकदीचे प्रयत्न सध्या तरी होत नसल्याचे चित्र आहे. परंतू पुंडलिक नगर येथे राहत असलेले पंकज गुजर हे त्यासाठी अपवाद ठरले आहे. शहरी भागात चिमण्यांना घरटे करण्यासाठी जागच उरली नाही परंतु ग्रामीण भागात त्यांचा चिवचिवाट मोठ्या प्रमाणात आढळून येते गुजर यांच्या भगीरथ प्रयत्न आणि भूतदया ही निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. लहानपणापासूनच पशू पक्षाचा लळा असल्याने आपण पक्षी संरक्षणासाठी काही तरी केले पाहिजे ही कल्पना मनात आली, त्या दृष्टीने घराच्या खुल्या जागेत मोठे शेड उभारुन हिरव्या वेली व झाडांनी नटवले, पक्षांसाठी अनेक घरटी तयार केली. आता या घरट्यांत शेकडो शेकडो चिमण्या, खारूताई, इतर पक्षांचा निवास असतो, अनेक अनोळखी व दुर्मिळ पक्षीही या घरट्यांत वास करतात.-पंकज गुजर, चिमणी संरक्षक, सिरसो (मूर्तिजापूर)

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला