शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्यांनी रुग्णांपर्यंत पोहोचविली औषधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 10:28 IST

विहान संस्थेंतर्गत काही एचआयव्ही बाधित इतर सहकारी रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून समोर आले.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक जण कोरोना योद्धा म्हणून समोर आलेत; पण स्वत:चाच जीव धोक्यात असताना इतर सहकारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अकोल्यातील ‘नेटवर्क आॅफ अकोला बाय पीपल लिव्हिन विथ एचआयव्ही’ म्हणजेच विहान संस्थेने गावोगावी फिरून सहकाऱ्यांना एचआयव्हीची औषधी वाटण्याचे काम गत तीन महिन्यांपासून करत आहेत. हा उपक्रम राबविताना त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असला, तरी हार न मानता परिस्थितीशी झगडत त्यांनी अनेकांपर्यंत एचआयव्हीची औषधी पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरू असताना त्यावर नियंत्रणासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले. संचारबंदीचा अनेकांना फटका बसला; पण हा काळ काही रुग्णांच्या जीवावरदेखील बेतला. विशेषत: एचआयव्ही बाधितांना या काळात औषधी मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत विहान संस्थेंतर्गत काही एचआयव्ही बाधित इतर सहकारी रुग्णांसाठी कोरोना योद्धा म्हणून समोर आले. त्यांनी हा धाडसी निर्णय तर घेतला; परंतु स्वत:ची रोगप्रतिकारकशक्ती सांभाळून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात जाऊन एचआयव्हीग्रस्तांपर्यंत औषधी पोहोचविली. हे सर्व करत असताना त्यांना अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. तरी देखील त्यांनी गत तीन महिन्यात ९५० एचआयव्हीग्रस्तांपर्यंत औषधी पोहोचविली.

हे होते आव्हानलॉकडाऊनच्या काळात रुग्णांपर्यंत औषधी पोहोचविण्याचे धाडस तर त्यांनी केले; पण त्यानंतरचे सर्वात मोठे आव्हान होते ते संबंधित रुग्णाची ओळख गोपनीय ठेवण्याचे. कारण गावात प्रवेश करताच विहानच्या चमूची चौकशी सुरू व्हायची, कोणाकडे जायचे, काम काय आहे, अशी विचारणाही व्हायची. त्यामुळे रुग्णाची ओळख उघड होण्याची शक्यता जास्त होती; मात्र हे आव्हान पेलून त्यांनी रुग्णांपर्यंत औषधी पोहोचविल्यात.

धान्य किटचे वाटपरुग्णांपर्यंत औषधी पोहोचविण्यासोबतच विहान संस्थेने १७५ गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्याचे कार्यही केले. यासाठी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मदत केली. हे कार्य करत असताना नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती विहानच्या अध्यक्षा शुभांगी खराटे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाmedicineऔषधंHIV-AIDSएड्स