शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’च्या विद्यार्थ्यांचे होणार थर्मल स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:16 IST

प्रत्येक वर्गखोलीमध्ये एका निरीक्षकांच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे १३ सप्टेंबरला होत असलेल्या नीट परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शारीरिक तापमानाची तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक वर्गखोलीमध्ये एका निरीक्षकांच्या देखरेखीखाली केवळ १२ विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर हात धुण्याकरिता ठिकठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबणाची व्यवस्था करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षी नीट परीक्षा घेणे अवघड झाले होते. या परीक्षेवरून केंद्र व राज्य सरकारमध्येही वादंग निर्माण झाला होता. अखेर ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेस टेस्ट-२०२०’ परीक्षा घेण्याचा निर्णय झाला व ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात आलेल्या आहेत. गर्दी होऊ नये, केंद्रावर प्रत्येक वेळी उमेदवारांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फूट जागा राखणे आवश्यक करण्यात आले आहे. उमेदवारांनी केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी साबणाने किंवा सॅनिटायझरने हात धुऊन स्वच्छ केले पाहिजे, यासाठी परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर किंवा साबण ठेवावे लागणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान थर्मल गन्स वापरून तपासले जाणार आहे. केंद्र कर्मचारी ही तपासणी करणार आहेत. तर वेगळ्या कक्षात परीक्षाउमेदवारांचे शरीर तापमान तपासण्यासाठी नोंदणी कक्षात थर्मल गन उपलब्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या शरीराचे तापमान कोविड-१९ मानदंडापेक्षा जास्त असेल, तर उमेदवारास स्वतंत्र खोलीत किंवा वेगळ्या कक्षात बसविल्या जाणार आहे. केंद्राचे निर्जंतुकीकरणआसन क्षेत्राची पूर्णपणे स्वच्छता केली जाणार आहे. सर्व दाराचे हॅण्डल, जिना रेलिंग, लिफ्ट बटणे यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक केले आहे. व्हिलचेअर्स असेल तर त्याचेही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना परीक्षा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. वर्ग खोलीची रचना पाहून ठरेल विद्यार्थी संख्यानीट परीक्षा देताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी एका वर्ग खोलीत एका प्राध्यापकाच्या निरीक्षणात केवळ १२ विद्यार्थी बसविले जातील. वर्ग खोली मोठी असेल तर २४ विद्यार्थी व त्यासाठी आणखी एक प्राध्यापकाची नियुक्ती परीक्षा घेण्यासाठी केली जाणार आहे. शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर ६६० परीक्षार्थीसांठी आम्ही परीक्षेची पूर्ण तयारी केली. सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले असून, सर्व सूचनांचे पालन करण्याची व्यवस्था केली आहे.-डॉ. रामेश्वर भिसेप्राचार्य शिवाजी महाविद्यालय, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा