शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण, नगर क्षेत्रातील सातबारा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:35 IST

अकोला : गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सातबारा देणे बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमिळकत पत्रिका किंवा सातबारा या दुहेरी नोंदीमुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. ते रोखण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट रोजी आदेश दिला. त्यानुसार सातबारा रद्द करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सातबारा देणे बंद करण्यात आले आहे. भूखंड, जमिनीच्या व्यवहारात ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मिळकत पत्रिका किंवा सातबारा या दुहेरी नोंदीमुळे मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. ते रोखण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट रोजी आदेश दिला. त्यानुसार सातबारा रद्द करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार शेत जमिनीसाठी सातबारा, तर नगर भूमापन किंवा गावठाण क्षेत्रासाठी मिळकत पत्रिका हा अधिकार अभिलेख आहे. तरीही नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील जमीन मालकांची नावे मिळकत पत्रिका व सातबारा घेण्याची प्रथा सुरूच आहे. त्यामुळे जमिनीच्या हक्कामध्ये गुंतागुंत होऊन फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले. विशेष म्हणजे, हे प्रकार एकच भूखंड किंवा जमिनीची दुहेरी नोंद होत असल्याने घडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गावठाण, नगर भूमापन कोणत्याही भूखंड, जमिनीची एकच नोंद पद्धत ठेवण्याचा आदेश जमाबंदी आयुक्तांना द्यावा लागला. यापूर्वीही ही दुहेरी नोंद पद्धत बंद करण्यासाठी डिसेंबर १९९० पासून जुलै २०११ पर्यंत सातत्याने आदेश देण्यात आले. तरीही राज्यातील नगर भूमापन असणाºया क्षेत्रातील सातबारा अद्यापही बंद झालेला नाही, हा प्रकार तातडीने बंद करून मिळकत पत्रिका नोंदीची प्रक्रिया सुरू करा, असेही जमाबंदी आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.- असा होईल सातबारा बंद..- नागरी, गावठाण क्षेत्रासाठी नगर भूमापन योजना लागू झाली व मिळकत पत्रिका तयार झाली, त्याठिकाणी बिनशेती झालेली सर्व सातबारा करणे.- जेथे नगर रचना योजना लागू असल्यास त्या क्षेत्रातील सातबारा व जुन्या मिळकत पत्रिका बंद करून नगर रचना योजनेत तयार झालेले बी फॉर्म नुसार अंतिम भूखंड क्रमांकानुसार मिळकत पत्रिकेवरील नोंदी कायम करणे अथवा नवीन मिळकत पत्रिका उघडणे.- तहसीलदार प्रत्येक गावासाठी आदेश काढून ई-फेरफार आज्ञावलीतून फेरफार घेऊन सात-बारा बंद करण्याचे निर्देश देतील.- मिळकत पत्रिका व सातबारावरील क्षेत्राच्या नोंदीमध्ये तफावत असल्यास प्रत्यक्ष मोजणी करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत केली जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार