शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गावात स्मशानभूमी नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करावा लागला अंत्यविधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:09 IST

तेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील थार हे अकराशे लोकसंख्येचे गाव असून, गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे.गावातील कमलाबाई भिमराव हेरोडे यांचे १७ आॅगस्ट रोजी झाले. त्यानंतर पार्थिव एका वाहनात ठेऊन तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेण्यात आला व तेथे अंत्यविधी करण्यात आला.

- सत्यशील सावरकरतेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली.तेल्हारा तालुक्यातील थार हे अकराशे लोकसंख्येचे गाव असून, गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. याठिकाणी स्मशानभूमी नसल्याने कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची मोठी पंचाईत होते. ज्यांची शेती गावालगत आहे, त्यांच्या कुटुंबातील कुणाचे निधन झाल्यास शेतात अंत्यविधी केला जातो. इतरांसाठी मात्र गावातून तेल्हाऱ्याकडे जाणारा रस्त्यालगतचा परिसर किंवा जुन्या गावातील ई-क्लास जमीन, असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. ई-क्लास जमीनीवरील अंत्यविधीच्या जागेकडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे हाल होतात. गावातील कमलाबाई भिमराव हेरोडे यांचे १७ आॅगस्ट रोजी निधन झाले. त्यातच गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने पावसात अंत्यविधी कसा करावा, या विवंचनेत असताना कुटुंबियांनी चार किलोमिटर अंतरावरील तेल्हारा येथे अंत्यंविधी करण्याचे ठरविले. त्यानंतर पार्थिव एका वाहनात ठेऊन तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेण्यात आला व तेथे अंत्यविधी करण्यात आला. गावात शेड असलेली स्मशानभूमी असती, तर आधीच दुखात असलेल्या कुटुंबियांना एवढी धावपळ करावी लागली नसती, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नातेवाईकांची गैरसोय होवू नये म्हणून तेल्हारा येथे अंत्यसंस्कार करावे लागले. - मोहन हेरोडे, थार.थार येथील ई क्लास जमीन जुन्या गावात आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. स्मशानभूमी साठी जिल्हा परिषद कडे प्रस्ताव पाठविला आहे.- गणेश खंडेराव, ग्रामसेवक, थार

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा