शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खाद्य तेलावर आयात शुल्क वाढल्यानंतरही सोयाबीनच्या दरात अपेक्षीत वाढ नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:44 IST

अकोला : सोयाबीन दरात चढ उतार सुरू असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी  वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. पण वेअर हॉऊसमध्ये शेतमाल ठेवण्याची कालमर्यादा सहा महिनेच असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी  शेतमाल तेथून काढून विकावा लागत आहे.सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढल्यानंतर सोयाबीनच्या दरात बऱ्या पैकी वाढ होईल अशी अपेक्षा होती पंरतु दरात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली नाही.

ठळक मुद्देसुरवातीला नाफेडव्दारे शासकीय खरेदी केंद्रावर १२ टक्के ओलाव्याचे निकष लावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकले.मागील महिन्यात सर्वच प्रकारच्या खाद्य तेलाच्या आयातीवर केंद्र शासनाने आयात शुल्क दुप्पट वाढवले.आजही कमीत कमी प्रति क्विंटलं  दर २,६०० रू पये एवढेच आहेत. तर हमी दर हे बोनस मिळून २,८७५ रू पये आहेत.

अकोला : सोयाबीन दरात चढ उतार सुरू असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी  वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. पण वेअर हॉऊसमध्ये शेतमाल ठेवण्याची कालमर्यादा सहा महिनेच असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी  शेतमाल तेथून काढून विकावा लागत आहे.सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढल्यानंतर सोयाबीनच्या दरात बऱ्या पैकी वाढ होईल अशी अपेक्षा होती पंरतु दरात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली नाही.केंद्र शासनाने यावर्षी प्रतिक्विंटल २,६७५ रू पये हमी दर जाहीर केले आहेत.त्यावर २०० रू पये बोनसही दिले जाणार आहे.पण सुरवातीला नाफेडव्दारे शासकीय खरेदी केंद्रावर १२ टक्के ओलाव्याचे निकष लावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकले.यामध्ये सर्वाधिक अल्पभूधारक ते मध्यम शेतकºयांचा समावेश होता.यावर्षी उशीरा व कमी झाल्याने पेरणीला उशीर झाला. पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडला,त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. एकरी अर्धा ते एक क्विंटलही उतारा लागला नाही. पण दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावण्यात आल्याने हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल ९०० ते १००० रू पये कमी दराने शेतकºयांना सोयाबीन विकावे लागले.दरम्यान,मागील महिन्यात सर्वच प्रकारच्या खाद्य तेलाच्या आयातीवर केंद्र शासनाने आयात शुल्क दुप्पट वाढवले. त्यामुळे दर वाढतील अशी शेतकºयांना अपेक्षा होती पण हे दर २,६०० ते २,९०० च्यावर पोहोचलेच नाहीत,आजही कमीत कमी प्रति क्विंटलं  दर २,६०० रू पये एवढेच आहेत. तर हमी दर हे बोनस मिळून २,८७५ रू पये आहेत.दुसरीक डे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी विविध यंत्रणांच्या वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. परंतु तेथे सोयाबीन ठेवण्याची काल मर्यादा ६ महिनेच आहे.या ६ महिन्यासाठी ६ टक्के व्याज आहे. त्यांनतर ८ व १२ टक्के व्याज असल्याने शेतकºयांना शेतमाल काढून विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे एकूण बाजारातील चित्र आहे.- सोयाबीनचे दर बºयापैकी वाढतील अशी अपेक्षा होती.पण आजमितीस हे दर प्रति क्विंटलं  २,६०० ते २,९०० रू पये आहेत.सुनील मालोकार,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.

 

 

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीAkola cityअकोला शहर