शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव नाहीच; मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:02 IST

Bird flu in Akola तज्ज्ञांच्या मते सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही.

ठळक मुद्देदोन्ही मृत कोंबड्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.११ ते १४ जानेवारीदरम्यान कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण केले आहे.

अकोला : कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूचीही भीती वाढू लागली आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील चाचोंडी येथे दोन कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या दोन्ही मृत कोंबड्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून, ग्रे पॅरोट या पक्ष्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून जिल्ह्यात कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बावणे यांनी दिली.

राज्यात विविध ठिकाणी मृत पक्षी आढळत असल्याने, नागरिकांमध्ये बर्ड फ्लूविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मृत पक्ष्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गत आठवड्यात अकोल्यातील चाचोंडी येथे दोन कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खबळब उडाली होती. पशुसंवर्धन विभागामार्फत या दोन्ही मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या दोन्ही कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. याच दरम्यान ग्रे पॅरोट हा मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात सिरो सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली, तसेच पोल्ट्री फार्म संचालकांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सिरो सर्वेक्षणांतर्गत २७८ नमुने तपासणीसाठी पाठविले

जिल्ह्यात ११ ते १४ जानेवारीदरम्यान कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण केले जात आहे. या अंतर्गत एकूण २७८ नमुने संकलित करून ते पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. हे नमुने अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

  1. पोल्ट्री फार्म संचालकांनी ही काळजी घ्यावी
  2. जैव सुरक्षिततेचे उपाय पोल्ट्री फॉर्म धारकांनी पाळणे आवश्यक आहे. वाइल्ड बर्डच्या संपर्कात येऊ देऊ नका.
  3. एक लीटर पाण्यात सात ग्रॅम धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) टाकून पोल्ट्री फॉर्मचा परिसर निर्जंतुकीकरण करावा.
  4.  

चाचोंडी येथील दोन्ही मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षभर विविध उपक्रमांतर्गत पशूंचे नियमित रोग परीक्षण केले जाते. बर्ड फ्लूच्या निमित्ताने ११ ते १४ जानेवारीदरम्यान कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत २७८ नमुने संकलित करून पुणे येथील प्रयोग शाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले.

- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाBird Fluबर्ड फ्लू