शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:30 IST

सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली.

अकोला: ‘अमृत’योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, त्याला पायबंद घालण्यासाठी सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली. या मुद्यावरून शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ घातला. या धामधुमीत महापौर विजय अग्रवाल यांनी विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर करत अर्ध्या तासात सर्वसाधारण सभा गुंडाळली. यामुळे संतप्त झालेल्या राजेश मिश्रा यांनी माईकची फेकफाक करून रोष व्यक्त केला.चार महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या सभेत शहर विकासाच्या मुद्यांवर तसेच अकोलेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी ‘अमृत’योजनेंतर्गत शहरातील जलवाहिनीच्या मुद्यावर चर्चा करण्याची विनंती महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे केली. ही मागणी फेटाळून लावत महापौरांनी नगर सचिव अनिल बिडवे यांना सूचीवरील विषयांचे वाचन करण्याचे निर्देश दिले. हा प्रकार पाहून शिवसेनेच्या नगरसेवकांनी आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले. त्यांच्या मदतीला काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, पराग कांबळे, मोहम्मद इरफान धावून आले. या गदारोळात महापौर विजय अग्रवाल यांनी सर्व विषय मंजूर करत सभा संपल्याचे जाहीर केले.प्रशासन ढिम्म का?प्रभागांमध्ये जलवाहिनीचे जाळे टाकताना पाइप किमान साडेतीन ते चार फूट खोल अंतरावर टाकणे अपेक्षित असताना संबंधित कंत्राटदार अवघ्या दीड ते दोन फूट खोल अंतरावर पाइप टाकत आहे. रस्ता खोदल्यानंतर तो तातडीने दुरुस्त करणे भाग आहे. मंजूर निविदेत रस्ता दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश आहे. कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला ठेंगा दाखवला आहे. ही बाब प्रशासनाच्या अखत्यारित असताना प्रशासन ढिम्म का, असा सवाल उपस्थित होत आहे.महिला व बाल कल्याण समितीचे गठनमहिला व बाल कल्याण समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे सभेत नऊ पैकी आठ महिला सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे, मनिषा भंसाली, मंगला म्हैसने, सोनी आहुजा, अनुराधा नावकार, उषा विरक, प्रमिला गीते यांचा समावेश आहे. काँग्रेसने सदस्यपदासाठी नाव दिले नाही.मिश्रा म्हणाले, चर्चा करा!‘अमृत’च्या जलवाहिनीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना त्यावर सभागृहात चर्चा करण्याची गरज आहे. महापौर साहेब, तुम्ही चर्चा करा किंवा आयुक्तांना खुलासा करू द्या, अशी मागणी राजेश मिश्रा यांनी केली.महापौर म्हणाले की, शासनाकडे तक्रार करा!यासंदर्भात तुम्ही मनपा आयुक्त किंवा शासनाकडे तक्रार करू शकता. या कामाची चौकशी लावा; मात्र सभागृहात चर्चा होणार नाहीच, असे महापौर विजय अग्रवाल यांनी मिश्रा यांना ठणकावून सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका