शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात घाटांचा लिलाव नाही; पण ‘वाळू’ची वाहतूक जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:05 IST

अकोला : जिल्ह्यातील ७५ वाळू घाटांचा लिलाव अद्याप बाकी आहे; परंतु, लिलाव न झालेल्या वाळू घाटातून चोरट्या मार्गाने वाळू माफियांकडून वाळूची वाहतूक मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूच्या वाहतुकीतून शासन खात्यात जमा होणारा  स्वामित्व धन शुल्काचा (रॉयल्टी) महसूल बुडत आहे.

ठळक मुद्दे७५ वाळू घाटांचा लिलाव बाकी ‘रॉयल्टी’ बुडीत

संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील ७५ वाळू घाटांचा लिलाव अद्याप बाकी आहे; परंतु, लिलाव न झालेल्या वाळू घाटातून चोरट्या मार्गाने वाळू माफियांकडून वाळूची वाहतूक मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूच्या वाहतुकीतून शासन खात्यात जमा होणारा  स्वामित्व धन शुल्काचा (रॉयल्टी) महसूल बुडत आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यांतील ८२ वाळू घाटांचा ऑनलाइन लिलाव करण्याचे नियोजन जिल्हा खनिकर्म विभागामार्फत करण्यात आले. त्यासाठी दोनदा राबविण्यात आलेल्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत बोली प्राप्त झालेल्या १७ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, बोली प्राप्त झाली नसल्याने, ७५ वाळू घाटांचा लिलाव होणे अद्याप बाकी आहे. विविध बांधकामांसाठी वाळूचा वापर वाढला असून, सध्या पाच हजार रुपये प्रती ब्रासप्रमाणे वाळूची विक्री होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ७५ वाळू घाटांचा ऑनलाइन लिलाव होणे अद्याप बाकी असला, तरी लिलाव न झालेल्या वाळू घाटातून वाळू माफियांकडून चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक केली जात आहे. या गोरखधंद्यातून वाळू माफियांची चांदी होत असून, वाळूच्या ‘रॉयल्टी’पोटी शासन खात्यात जमा होणारा महसूल मात्र बुडत आहे. लिलाव न झालेल्या वाळू घाटातून वाळूची सर्रास वाहतूक सुरू असल्याने, शासनाचा महसूल बुडत असल्याच्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

७५ वाळू घाटांत ६३२७१ ब्रास वाळू उपलब्ध!अद्याप लिलाव न झालेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ७५ वाळू घाटांमध्ये ६३ हजार २७१ ब्रास वाळू उपलब्ध आहे. परंतु, लिलाव झाला नसल्याने, या वाळू घाटातील वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे. त्यामुळे वाळू घाटांतील वाळू कमी होत आहे.

लिलावातून सहा कोटींचा महसूल अपेक्षित!७५ वाळू घाटांच्या लिलावातून ‘रॉयल्टी’पोटी जिल्हाधिकारी कार्यालयाला सहा कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. परंतु, या वाळू घाटांचा लिलाव अद्याप झाला नसला, तरी वाळू घाटांतील वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याने, या वाळू घाटांपासून मिळणारा महसूल बुडत आहे.

जिल्ह्यात वाळूच्या अवैध वाहतूकसंदर्भात कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत.-डॉ. अतुल दोड,  जिल्हा खनिकर्म अधिकारी 

टॅग्स :Akolaअकोला