शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा

By admin | Updated: July 10, 2015 01:29 IST

अकोला जिल्ह्यातील चित्र; शाळांमध्ये पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव.

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांमधील स्वच्छता पडताळणी मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी केंद्रीय अतिरिक्त आयुक्त (कृषी विभाग भारत सरकार) डॉ. के.पी. वासनिक ग्रामीण भागात पोहचले. शाळांच्या पडताळणीदरम्यान एका शाळेत विद्यार्थी अस्वच्छतेत पोषण आहार घेत असल्याचे आढळून आले, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळांमधील स्वच्छतेच्या पडताळणीसाठी राज्यातून अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय अतिरिक्त आयुक्त (कृषी विभाग भारत सरकार) डॉ. के.पी. वासनिक हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे. बुधवारी त्यांच्या दौर्‍याची सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी त्यांनी अकोल्यातील मनपाच्या ३४ शाळांची, तर दोन ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहचून स्वच्छतेबाबत पाहणी केली. यानंतर मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी ग्रामीण भागातील शाळांना कुठलीही पूर्व सूचना न देता भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी आकोट तालुक्यातील चोहट्टा, वडाली सटवाई, पाटसूल, रौंदडा आदी ग्रामीण भागातील शाळांना भेट दिली. दरम्यान, चोहट्टा येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत विद्यार्थी खिचडी खाताना आढळून आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या ताटातील खिचडी खाऊन तिचा दर्जा बघितला. पोषण आहार खाण्यासाठी विद्यार्थी जमिनीवरच बसलेले होते, तर त्यापूर्वी त्यांनी हातदेखील धुतलेले नव्हते. शौचालयाची पाहणी केल्यास तिथे साबण आढळली नसल्याने या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे आढळून आले. यानंतर तेल्हारा येथील अडसूळ, उमरी या गावातील शाळांची पाहणी केली असता येथे शाळांमधील स्वच्छतागृहांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले. तर बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा, लोहारा या ग्रामीण भागातील शाळांचीदेखील पडताळणी यावेळी त्यांनी केली. एकंदरीत ग्रामीण भागातील शाळांमध्ये अस्वच्छता आढळली असून, काही ठिकाणी स्वच्छतागृहांची दुर्दशा तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवली. तसेच शाळा व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांना स्वच्छतेसंबंधी शिक्षण दिल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र या मोहिमेच्या माध्यमातून उघडकीस आले.