शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वॉफ्टवेअर’मध्ये २५ गावेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:14 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन अर्ज भरण्याच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये जिल्ह्यातील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित गावांमधील शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा वांधा निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या स्वॉफ्टवेअरमध्ये २५ गावे तातडीने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडे पाठविला.

ठळक मुद्देकर्जमाफीचे अर्ज भरण्याचा वांधा!माहिती संचालनालयाकडे पाठविला गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन अर्ज भरण्याच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये जिल्ह्यातील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित गावांमधील शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा वांधा निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या स्वॉफ्टवेअरमध्ये २५ गावे तातडीने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडे पाठविला.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेबसाइटवर भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलैपासून सुरू करण्यात आले आहेत. कर्जमाफीचे शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन स्वॉफ्टवेअरमध्ये  जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांतील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित २५ गावांमधील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या स्वॉफ्टवेअरमध्ये जिल्ह्यातील २५ गावे तातडीने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ६ सप्टेंबर रोजी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाच्या संचालकांकडे पाठविला आहे.

ऑनलाइन ‘ स्वॉफ्टवेअर’मध्ये  नसलेली अशी आहेत गावे !पातूर तालुका : दादुलगाव, बाभळी, कोठारी बु., दधम, वरणगाव, चिंचखेड (पातूर), भानोस, बेलतळा, निमखेड, शिवपूर, अडगाव बु., हिंगणा वाडे, उमरवाडी.तेल्हारा तालुका :  साल्काबाद, नुराबाद, ममतदाबाद, तेल्हारा बु., तेल्हारा खुर्द, सोनखेळ.अकोट तालुका  : निजामपूर, गिरजापूर, गरसोळी, सालखेड, आगासखेड, पिलकवाडी.    

एक लाखावर शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!    कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४0 हजार ७६२ शेतकर्‍यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ३ हजार ६४७ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज सेतू केंद्रांवर भरल्याचे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.