शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील ७४७ गावांत सुरू होणार शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला: कोरोनामुक्त असलेल्या आणि पुढेही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: कोरोनामुक्त असलेल्या आणि पुढेही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील ७४७ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील ७४७ गावे २६ जूनपर्यंतच्या अहवालानुसार, कोरोनामुक्त असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील शाळा सुरू करण्याबाबत पडताळणी होेऊ शकते, परंतु राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार, जिल्ह्यातही सोमवारपासून नव्याने निर्बंध लागणार असून, यात शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

------------------------------