शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टॅंकरमधून पेट्रोल, डिझेलची चोरी; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरमधून पेट्रोल, डिझेलचोरीचा प्रकार गत महिनाभरापासून सुरू होता. याबाबत मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरमधून पेट्रोल, डिझेलचोरीचा प्रकार गत महिनाभरापासून सुरू होता. याबाबत मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी सापडा रचला. गायगाव डेपोतून भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर क्रमांक (एमएच २७-एक्स-९९९०) हा १२ हजार लिटर डिझेल, पेट्रोल घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे जात होता. टँकर गायगाव येथून कापशी-बार्शीटाकळीमार्गे जात असताना शिंदखेडरोडवरील रेल्वे गेटच्याजवळ टँकरचालक आणखी दोन व्यक्ती असे तिघं मिळून टँकरमधून प्लॅस्टिक पाइपच्या साहाय्याने पेट्रोल, डिझेलची चोरी करीत असताना आढळून आले. याकारवाईत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६० लिटर पेट्रोल, डिझेलचा साठा, पेट्रोल-डिझेल चोरी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य, पेट्रोल-डिझेलने भरलेला टँकर असा एकूण २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमधे जीवनावश्यक वस्तू कायदा ई.सी. ऍक्ट आणि कलम ३७९नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विकास राठोड, पोलीस मंगेश सुळे, रवी पोपडे, सुनील पवार, गजानन ठाकरे, संदीप गुंजाळ यांनी केली. (फोटो)