लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील कमल हाऊसिंग सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका फ्लॅटमध्ये प्रवेश करून रोख रक्कम १५ ते २0 हजार लंपास केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कमल हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे राजेश सुभाषचंद्र राठी यांच्या तक्रारीनुसार ३ जुलैच्या रात्रीदरम्यान त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील हॉलमध्ये असलेल्या कपाटातून १५ ते २0 हजार रुपयांची रोख लंपास केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कमल सोसायटीमध्ये चोरी; गुन्हा दाखल
By admin | Updated: July 5, 2017 00:49 IST